सावंतवाडीतील मोती तलावात वृध्दाचा मृतदेह आढळला
By अनंत खं.जाधव | Updated: May 27, 2024 11:48 IST2024-05-27T11:48:26+5:302024-05-27T11:48:54+5:30
सावंतवाडी : येथील मोती तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे ...

सावंतवाडीतील मोती तलावात वृध्दाचा मृतदेह आढळला
सावंतवाडी : येथील मोती तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. ते सावंतवाडी भटवाडी भागात राहत होते. खंदारे यांच्या दुचाकीला १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यात त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे ते आजारी होते.
काल, रविवारी सकाळी आपल्या चुलत सुनेला बाजारातून जाऊन येतो, असे सांगून ते निघून गेले होते. पण उशिरापर्यंत ते घरी परतले नव्हते. दरम्यान दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह मोती तलावाच्या पात्रात आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची ओळख पटली.
त्यांचा मुलगा मुंबईत राहत असल्यामुळे ते आपल्या पुतण्याकडे भटवाडी येथे राहत होते. त्यांच्याकडे जेवण खाणे असायचे. गेले काही दिवसापूर्वी अपघात झाल्यामुळे ते आजारी होते. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.