टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

By अनंत खं.जाधव | Published: July 6, 2024 02:08 PM2024-07-06T14:08:23+5:302024-07-06T14:09:18+5:30

गोव्यात आरटीओकडून बॅचच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात लूट, राजन तेलींनी बाजू मांडली 

The dispute started over the batch of taxi drivers will be resolved, Assurance from Chief Minister of Goa | टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “टॅक्सी” चालकांच्या बॅच वरून निर्माण झालेला वाद सोमवार पर्यंत सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. माजी आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी हे आश्वासन दिले.

बॅचच्या नावावर गोव्यात होत असलेली लूट रोखा, अशी मागणी  गोव्यात काम करणाऱ्या टॅक्सी चालक तरुणांनी केली होती. तसेच याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका न घेतल्यास गोव्यात जाणाऱ्या गाड्या रोखू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी माजी आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी हे आश्वासन दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शेखर गावकर, प्रीतेश राऊळ, संजय सातार्डेकर, युवामोर्चा दोडामार्ग मंडळ अध्यक्ष पराशर सावंत, देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.

गोव्यात आरटीओकडून बॅचच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात लुट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे आज तेली यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाजू मांडली त्यानंतर हे आश्वासन दिले आहे.

Web Title: The dispute started over the batch of taxi drivers will be resolved, Assurance from Chief Minister of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.