कोकणातून हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:14 PM2023-11-17T12:14:08+5:302023-11-17T12:15:03+5:30
देवगड : विजयदुर्ग येथील रामेश्वर घरीवाडी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी मिलेश बांदकर यांची यावर्षीची पहिली सहा डझनावारी हापूस आंब्याची ...
देवगड : विजयदुर्ग येथील रामेश्वर घरीवाडी येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी मिलेश बांदकर यांची यावर्षीची पहिली सहा डझनावारी हापूस आंब्याची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना झाली.
हापूस आंब्याला जागतिक स्तरावर पोहाेचविणारे मिलेश बांदकर बंधूनी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला पाठविली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर काळात त्यांच्या आंबा कलम बागेत मोहर आला होता. हा मोहोर त्यांनी मेहनत करून वाचवला.
या काळात पाऊस होऊनसुद्धा कोणत्याही झाडाला छप्पर न करता त्यांनी आलेला आंबा मोहोर वाचवला. त्यांच्या आंबा बागेत चार पेट्या आंबा अजून असून पुढील आठवड्यातच हा आंबा मुंबई वाशी येथे रवाना होणार असल्याचे मिलेश बांदकर यांनी सांगितले.