विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 16, 2022 06:19 PM2022-07-16T18:19:24+5:302022-07-16T18:27:38+5:30

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात.

The fortifications of Vijaydurg Fort are in danger | विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर

Next

सिंधुदुर्ग : शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष म्हणून ओळख असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी वर्षानुवर्ष धोक्यात येत चालली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात.

मागील दोन वर्षांपासून माजी खासदार संभाजीराजेंनी याबाबत पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. संभाजीराजेंनी गतवर्षी विजयदुर्ग किल्ल्याच्या ढासळत चाललेल्या तंटबंदीची पाहणी केली होती. तसेच या समस्येकडे केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, शासनाच्या पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन होणारी पडझड रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शासनाला जाग कधी येणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अलौकिक कार्यकर्तृत्वाने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक किल्ल्यांना अखेरची घरघर लागली आहे. किल्ल्यांचा इतिहास लुप्त झाल्यानंतर सरकारला जाग येणार का? अशी विचारणा आता शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमींमधून होत आहे.

संभाजीराजेंनी पुन्हा लक्ष वेधले

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडनंतर विशाळगडावरही बुरुज ढासळल्याने दोन्ही किल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या दोन किल्ल्यांची पडझड मनाला वेदना देत असतानाच मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि शिवरायांनी पुर्नबांधणी करून घेतलेला विजयदुर्गही आता संकटात सापडला आहे. आता या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी गडाची तटबंदीला फुगवटा आल्याने केंद्र सरकार, राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात २०२० मध्येच पत्रव्यवहार करून डागडूजी करण्यासाठी विनंती केली होती.

Web Title: The fortifications of Vijaydurg Fort are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.