सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवलीत इमारतीवरील लोखंडी छप्पर कोसळले, सुदैवाने मोठी हानी टळली

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 24, 2024 12:24 PM2024-07-24T12:24:16+5:302024-07-24T12:24:37+5:30

कणकवली : कणकवली शहरात सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर ...

The iron roof of a building collapsed in Kankavli due to gusty winds, fortunately a major loss was avoided | सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवलीत इमारतीवरील लोखंडी छप्पर कोसळले, सुदैवाने मोठी हानी टळली

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवलीत इमारतीवरील लोखंडी छप्पर कोसळले, सुदैवाने मोठी हानी टळली

कणकवली : कणकवली शहरात सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर येऊन पडले. शहरातील श्रीधर नाईक चौकात असलेल्या बिल्डिंग वरील हे छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर पडले. मात्र सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर पादचारी अथवा वाहन नसल्याने मोठी हानी टळली. 

सदरच्या सात मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आले होते. काही मिनिटाच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होते. तेथून ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावर पडले. तेथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहताच तेथील रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबविले होते. 

तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावर एका बाजूला पडले. छप्पर पडले त्यावेळी वाहने अथवा पादचारी असते तर मोठी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीस, नागरिक, नगरपंचायत कर्मचारी दाखल झाले होते.

Web Title: The iron roof of a building collapsed in Kankavli due to gusty winds, fortunately a major loss was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.