Sindhudurg: फोंडाघाटात कोसळलेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत

By सुधीर राणे | Updated: September 9, 2023 17:30 IST2023-09-09T17:29:10+5:302023-09-09T17:30:34+5:30

कणकवली: जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सुरक्षित असलेल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर अंतरावरील परिसरात शनिवारी सकाळी दरडी ...

The landslides in Fondaghat has been removed, Traffic started | Sindhudurg: फोंडाघाटात कोसळलेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत

Sindhudurg: फोंडाघाटात कोसळलेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत

कणकवली: जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सुरक्षित असलेल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर अंतरावरील परिसरात शनिवारी सकाळी दरडी कोसळली. दरडीचे दगड, मलबा, माती रस्त्यावर पसरल्याने तेथील वाहतूक बंद झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. 

रस्ता बंद झाल्याचे समजताच नेहमी फोंडाघाटात हजर असणारे वाहतूक पोलिस तत्काळ कार्यरत झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता बंद झाल्याची माहिती समजताच उपकार्यकारी अभियंता के.के. प्रभू, शाखाअभियंता प्रमोद कांबळे तसेच कर्मचारी शाहू शेळके, पावसकर, सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पवन भालेकर यांच्या जेसीबी द्वारे दरडी हटवून एक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. मात्र घळणीवरून पाझरणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे  कालांतराने दरडी कोसळत होत्या.

यादरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी,कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, खारेपाटण तलाठी अरुणा जयानावर, फोंडा मंडळ अधिकारी नीलिमा प्रभू, कोतवाल पांडुरंग राणे यांच्यासह अधिकारी वर्गाने, दरडी कोसळत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांना सूचना देऊन दरडी हटवून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घाटातील वाहतूक दोन्ही बाजूनी सुरू करण्यात आली. 

मात्र, सतत पाऊस पडल्यास रस्ता रुंदीकरणामुळे घळणी मोकळ्या झाल्याने, दरडी कोसळण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. तेथील स्थितीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस लक्ष देऊन आहेत. दोन जेसीबी तसेच कर्मचारी घटनास्थळापासूनच जवळच कार्यरत ठेवण्यात आले आहेत. असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The landslides in Fondaghat has been removed, Traffic started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.