निवृत्त एसटी कर्मचाऱ्याच्या हत्येचे गुढ उलगडणार, 1 वर्षाने उघडली फाईल
By अनंत खं.जाधव | Published: December 11, 2022 03:55 PM2022-12-11T15:55:33+5:302022-12-11T15:56:35+5:30
पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी भेट: बंद फाईल एक वर्षानंतर उघडली
सावंतवाडी :सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एसटीचे निवृत्त कर्मचारी रमेश ठाकूर यांच्या खुनाची बंद झालेली फाईल पुन्हा उघडण्यात आली असून,स्वता पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी स्वता घटनास्थळाची पाहाणी करत घटनेची माहिती घेतली आहे. तसेच तपास पथकाला अलर्ट करत काहि संशयितांची चौकशी ही केली आहे.
सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथे राहत असलेले एसटी निवृत्त कर्मचारी रमेश ठाकूर यांचा मृतदेह 8 जुलै 2021 ला त्याच्या राहत्या घरात मिळाला होता.रमेश ठाकूर यांचे लग्न झाले नव्हते तसेच त्यांचे नातेवाईक ही बाहेर असल्याने ते घरी एकटेच राहत होते.याच संधीचा फायदा घेत अज्ञाता कडून त्याचा खून करण्यात आला होता. ठाकूर यांचा मृतदेह ते राहत असलेल्या घरात न मिळता तो बाजूच्या खोलीत मिळाला होता.ही खोली सहसा ते भाड्याने देत असत पण त्या काळात कोण भाड्याने राहत नव्हते त्यामुळे ठाकूरच ही खोली वापरत होते.याच संधीचा फायदा अज्ञाता कडून घेण्यात आला आणि कोणत्याही हत्याराचा वापर न करता ठाकूर यांचा खून करत गळ्यातील चेन चोरून नेली तसेच या चेन मधील काहि भाग हा तेथेच पडून होता.पण हा खून चोरीच्या उद्देशाने झाला कि अन्य कारणाने झाला याचा सुगावा अद्याप पर्यत लागला नाही.तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सुरूवातीचे काहि दिवस तपास केला पण नंतर त्याची बदली झाली आणि तपासाची फाईल बंद झाली ती अद्याप पर्यंत उघडली नाही.
सौरभ अग्रवाल यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी रमेश ठाकूर खुनाचा गुन्हा फाईल बंद झाला आहे.तो उघडकीस आणण्यासाठी स्वता मैदानात उतरले असून शुक्रवारी घटनास्थळाची पाहाणी करत तपासाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तसेच तत्कालीन अधिकारी कर्मचारी याच्याकडून ही माहिती घेतली आहे.त्यामुळे आता बंद असलेली खुनाची फाईल पुन्हा उघडणार आहे.
दुहेरी हत्याकांडातील संशयिता इकडे चौकशी
रमेश ठाकूर यांचा खून झाला होता.त्यानंतर काहि दिवसात दोन वृध्दाना निघुर्ण रित्या मारून त्याचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना सावंतवाडीत घडली होती.या प्रकरणात संशयित म्हणून कुशल टगसाळी याला ताब्यात घेण्यात आले आहे.त्याचीही पोलीसांकडून या प्रकरणात चौकशी केली मात्र अद्याप पर्यत छडा लागला नाही.