coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ८० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 11:45 AM2022-08-04T11:45:25+5:302022-08-04T11:46:20+5:30

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असली तरी सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने तापसरीची जोरदार साथ

The number of active corona patients in Sindhudurg district is over 80 | coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ८० वर

coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या ८० वर

Next

कणकवली : जिल्ह्यात काल, बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ५६ हजार ३१२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखीन ११ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आज अखेर उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण ५६.३१२ आहेत. आज अखेर मृत  झालेले रुग्ण १५३६ आहेत. तर आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५७९२८ आहेत. तालुकानिहाय बुधवारी सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण देवगड १, दोडामार्ग ३, कणकवली १, कुडाळ १, सावंतवाडी ३ असे आहेत. वैभववाडी व मालवण तालुक्यात नवीन रुग्ण बुधवारी साडलेला नाही.

हळूहळू कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात येत असली तरी सध्या ऊन पावसाचा खेळ सुरु असल्याने तापसरीची जोरदार साथ जिल्ह्याच्या सर्वच भागात पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: The number of active corona patients in Sindhudurg district is over 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.