Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांनीच ठरविला आमदार, मतदानात महिलांचा सहभाग कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:16 PM2024-12-03T16:16:32+5:302024-12-03T16:16:45+5:30

महिला मतदारांची संख्या जास्त मात्र प्रत्यक्षात मतदानात संख्या होती कमी

the number of women voters is higher among the total voters but the actual number of voters is less In Sindhudurg district | Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांनीच ठरविला आमदार, मतदानात महिलांचा सहभाग कमी

Vidhan Sabha Election 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांनीच ठरविला आमदार, मतदानात महिलांचा सहभाग कमी

मनोज वारंग

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असली, तरी प्रत्यक्षात मतदानात मात्र महिलांची संख्या कमी असते. विधानसभा निवडणुकीतही महिलांनी हव्या तेवढ्या उत्साहात मतदानात भाग घेतला नसल्याने जिल्ह्यातील आमदार निवडीत पुरुष मतदारांचे मत निर्णायक ठरले, असे म्हणावे लागेल.

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात मिळून  ६,७८,९२८ एवढे मतदार होते. यात ३,३६,९९१ पुरुष, ३,४१,९३४ महिला आणि ३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. यापैकी प्रत्यक्ष ४,८३,००१ मतदारांनी मतदान केले. यात २,४९,५६२ पुरुष आणि २,३३,४३९ महिलांचा समावेश आहे.

मतदारांमध्ये वाढ, टक्केवारीतही वाढ

लोकसभा निवडणुकीत २,२९,३५३ पुरुष आणि २,१०,०६५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या जास्त झाल्याने मतदानाच्या संख्येत आणि टक्केवारीत वाढ झाली. परिणामी, विधानसभा निवडणुकीत २,४९,५६२ पुरुष आणि २,३३,४३९ महिला मतदारांनी मतदान केले.

कोणत्या मतदारसंघात काय घडले?

मतदारसंघ - एकूण मतदान - महिलांचे मतदान - निवडून आलेला आमदार कंसात पक्ष

  • कणकवली - १,६१,०९६ - ७८,०९३ - नितेश राणे (भाजपा)
  • कुडाळ - १,५७,३२३ - ७५,७३९ - नीलेश राणे (शिंदेसेना)
  • सावंतवाडी - १,६४,५८२ - ७९,६०७ - दीपक केसरकर (शिंदेसेना)


४ टक्के वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत एकूण ६७ टक्के एवढे मतदान झाले होते. तेच विधानसभा मतदारसंघात एकूण ७१.१४ टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ४ टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याचे स्पष्ट होते

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघातील मतदार- ६,७८,९२८

  • ३,३६,९९१ -पुरुष
  • ३,४१,९३४- महिला

Web Title: the number of women voters is higher among the total voters but the actual number of voters is less In Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.