देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा योग्य प्रकारे सुरू, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली माहिती
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 5, 2023 05:23 PM2023-10-05T17:23:20+5:302023-10-05T17:23:46+5:30
देवगड ( सिंधुदुर्ग ) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. ...
देवगड (सिंधुदुर्ग) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. तसेच चार अधिपरिचारीका ही देण्यात आल्या आहेत. रुग्णसेवा चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्टाफ आता उपलब्ध झाला असून उर्वरित पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. त्यांच्या समवेत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांनी गुरुवारी देवगड ग्रामीण रुग्णालयात तातडीने भेट दिली. रुग्णालयात असलेली यंत्रसामग्री औषधे रुग्णसेवा व स्टाफ याचा पूर्णतः आढावा घेतला.
डॉ. विटकर यांना समज
कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वसूचना दिल्याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विटकर यांनी आपले कार्यक्षेत्र सोडू नये अशा शब्दात त्यांना समज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक पाटील यांनी दिली. यापुढे असा प्रकार झाल्यास नोटीस बजावण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
२ M.B.B.S अधिकारी
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य योजनेतून डॉ. संजय विटकर व डॉ. अर्चना राजपूत या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असल्याचे पाटील यांनी सांगितले. रुग्णालयामध्ये सर्वात जास्त गरज गरोदर मातांना सेवा देणे ही आहे. यामुळे हे पद स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ. रघुनाथ जोशी यांच्याकडे आहे. तसेच डॉ. अर्चना राजपूत या ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. याशिवाय होमिओपॅथी व आयुर्वेदिक कोणत्याही सेवा कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली जात आहे. शासनाकडे या रिक्त पदाबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारी ही भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.