कणकवलीतील वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे, कलमठ ग्रामस्थ आक्रमक 

By सुधीर राणे | Published: June 13, 2023 11:54 AM2023-06-13T11:54:12+5:302023-06-13T11:54:26+5:30

कणकवली : कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित, नादुरुस्त वीज खांब, अपुरे ...

The power distribution office in Kankavli was blocked, the villagers of Kalamath were aggressive | कणकवलीतील वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे, कलमठ ग्रामस्थ आक्रमक 

कणकवलीतील वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकले टाळे, कलमठ ग्रामस्थ आक्रमक 

googlenewsNext

कणकवली : कलमठ गावातील वीज समस्येबद्दल ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित, नादुरुस्त वीज खांब, अपुरे कर्मचारी, अधिकारी कायमच नॉट रिचेबल असणे अशा अनेक तक्रारी वरिष्ठांकडे वारंवार करून देखील कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी थेट कणकवली येथील वीज वितरणाच्या ग्रामीण विभागाच्या कार्यालयाला मंगळवारी टाळे ठोकले. 

जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी तिथे येऊन समस्यांची दखल घेत नाहीत तोपर्यंत टाळे उघडणार नाही असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश लाड, पपू यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, आबा कोरगावकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The power distribution office in Kankavli was blocked, the villagers of Kalamath were aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.