सावंतवाडी नगरपरिषदेचा प्रकल्प राज्याने स्वीकारला, बांधकामाच्या ऑनलाईन परवानगीची राज्यात अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 06:47 PM2022-08-03T18:47:01+5:302022-08-03T18:47:33+5:30

एक वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने बांधकाम त्या परवानग्या देणे सुरू केले होते

The project of Sawantwadi Municipal Council was accepted by the state. Implementation of online permission for construction in the state | सावंतवाडी नगरपरिषदेचा प्रकल्प राज्याने स्वीकारला, बांधकामाच्या ऑनलाईन परवानगीची राज्यात अंमलबजावणी

सावंतवाडी नगरपरिषदेचा प्रकल्प राज्याने स्वीकारला, बांधकामाच्या ऑनलाईन परवानगीची राज्यात अंमलबजावणी

Next

अनंत जाधव

सावंतवाडी : राज्य सरकारच्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंतर्गत ऑफलाईन बांधकाम परवानगी  पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याबाबतचा पायलट प्रोजेक्ट सावंतवाडी नगरपरिषद ने राबवला त्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर हा प्रोजेक्ट राज्य सरकारने स्वीकारत त्याची संपूर्ण राज्यात अमलबजावणी केली.

एक वर्षांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेने ऑनलाईन पद्धतीने बांधकाम त्या परवानग्या देणे सुरू केले होते तर राज्य सरकार कडून अलीकडेच याबाबत अध्यादेश काढत ऑनलाईन पद्धतीने परवानग्या दिल्या जाव्यात असे सांगितले. ऑनलाईनमुळे पारदर्शकता येत असली तरी पालिकेच्या उत्पन्नावर मात्र थोडाफार का होईना परिणाम झालेला दिसून येत आहे.

साॅप्टवेअरमध्ये त्रुटी

  • 30 जून पासून ऑफलाइन परवानगी बंद झाली त्यानंतर ऑनलाईन काम सुरू झाले परंतु सॉफ्टवेअरच्या त्रुटीमुळे पहिल्यांदा अडचणी येत होत्या आता मात्र या अडचणी थोड्या कमी होऊ लागल्या आहेत.
  • सुरुवातीला ऑफलाइनमुळे नागरिक थेट पालिकेमध्ये येऊन आपली कामे करून घेत होती पण आता ऑनलाइन परवानगी मुळे नागरिकांना हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याचे मार्गदर्शन केले जात आहे.
     

बांधकाम परवानगी ओघ कमी

सावंतवाडीत वर्षाकडे 100 च्या आसपास परवानग्या देण्यात येतात मात्र पावसाळ्याला सुरुवात झाली की बांधकाम परवान ग्याचे.प्रमाण घटते अनेक जण आपली कामे पावसाळ्यात बंद ठेवतात त्यामुळे बांधकाम परवानगीचा पावसाळ्यात कमी झाल्याचे दिसून येत आहे.

नगरपालिकेचे उत्पादन निम्म्यावर

ऑनलाईन बांधकाम परवानगीमुळे नगरपालिकेच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे व्यवहार पारदर्शक झाले असले तरी नागरिकांना कामासाठी सतत नगरपालिका अधिकाऱ्यांकडे ये जा करावी लागत नाही.



ऑनलाईन पद्धत भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण

शासनाने नव्याने सुरू केलेल्या ऑनलाईन बांधकाम परवान्यांचा फायदा ही आहे आणि तोटाही आहे फायदा असा आहे की एकदा कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने समेट केल्यावर सतत पालिकेत जावे लागत नाही तर तोटा असा आहे जर कागदपत्रे समेट करताना त्यातील एखादा कागद जरी राहिला तर परवानगी नाकारते. - अजय गोंदावले, बांधकाम व्यावसायिक

ऑनलाइन पद्धतीमुळे फायदा होत आहे यातून काही प्रमाणात खर्चाची बचती होऊ लागली असून फायलींवर झालेल्या कारवाईची स्थिती पाहता येते त्यामुळे ही पद्धत चांगली असल्याचे सर्वसामान्यातून तसेच बांधकाम व्यवसायिक ही म्हणत आहेत.  - बांधकाम व्यावसायिक

ऑनलाईन परवानगी सोयीची

सावंतवाडीत ऑनलाईन परवानगी पध्दत एक वर्षापूर्वी पासून लागू आहे सावंतवाडी नगरपालिकेने पायलट प्रोजेक्ट राबवला होता त्याची अमलबजावणी आता राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.ही पध्दत चांगली असून ऑनलाईन परवानगी ला कागदपत्रे सुस्थितीत असतील तर अडचणी येत नाहीत.  - सुधाकर गजबार, बांधकाम अधिकारी,  सावंतवाडी नगरपरिषद

Web Title: The project of Sawantwadi Municipal Council was accepted by the state. Implementation of online permission for construction in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.