गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षेचे प्रमाण वाढले
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 30, 2024 06:56 PM2024-01-30T18:56:53+5:302024-01-30T18:57:23+5:30
सिंधुदुर्ग : न्यायालयात सर्व पातळ्यांवर टिकेल अशा सबळ पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा न मिळाल्याचे प्रकार अनेकदा घडतात. ही ...
सिंधुदुर्ग : न्यायालयात सर्व पातळ्यांवर टिकेल अशा सबळ पुराव्यांअभावी गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा न मिळाल्याचे प्रकार अनेकदा घडतात. ही त्रुटी दूर करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनी सातत्याने प्रयत्न केले. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ, सखोल तपासासाठी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण आणि योग्य समन्वयामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोषसिद्धीच्या टक्केवारीत फौजदारी खटल्यात चांगली कामगिरी झाली आहे. तर स्पेशल अँड लोकल लॉच्या एकुण खटल्यांपैकी निम्म्या गुन्हेगारांना दोष सिद्ध होऊन त्यांना शिक्षा लागलेल्या आहेत. सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकांचा पुढाकार त्यासाठी महत्वाचा ठरला आहे.
लैंगिक अत्याचार, खून प्रकरणात शिक्षा
सन २०२३ मध्ये खून, तथा लैंगिक अत्याचाराच्या बहुतांश खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली. पोलिसांनी यशस्वी युक्तीवाद केल्याने ती दोषसिद्धी मिळाली.
यशस्वी युक्तिवाद
न्यायालयाच्या पायरीवर गुन्हे सिद्ध करून आरोपींना शिक्षा ठोठावण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे पोलिसांकडून प्रकरणांचा तपास योग्य पद्धतीने होत असून युक्तीवादही चांगल्या प्रकारे होत आहे.