विहीरीमध्ये पडलेल्या गव्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने दिले जीवदान, सिंधुदुर्गातील तेंडोली येथील घटना

By सुधीर राणे | Published: December 22, 2022 05:15 PM2022-12-22T17:15:43+5:302022-12-22T17:29:38+5:30

विहिरीतून बाहेर निघताच पिल्लाने नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली.  ​​​​​​​

The rescue team of Forest area Kudal gave life to a gaur that fell in a well in Tendoli. | विहीरीमध्ये पडलेल्या गव्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने दिले जीवदान, सिंधुदुर्गातील तेंडोली येथील घटना

विहीरीमध्ये पडलेल्या गव्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने दिले जीवदान, सिंधुदुर्गातील तेंडोली येथील घटना

Next

कुडाळ: तेंडोली तळेवाडी येथील शांताराम अण्णा तेली यांच्या कठडा नसलेल्या शेत विहीरीमध्ये आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास गव्याचे पिल्लू पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत माजी सरपंच मंगेश प्रभू यांनी वनपाल नेरूर हवेली धुळु कोळेकर यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र कुडाळचे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्या पिल्लास सुखरूख बाहेर काढले.

विहिर परिसरात माड व काजूबागायती क्षेत्र असलेने घटनास्थळी जेसीबी मशीन अथवा क्रेन घेऊन जाणे अशक्य होते. वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल झाले. नंतर १५-२०  फूट खोल विहिरीमध्ये वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांनी शिडी व दोर याच्या साहाय्याने उतरून त्या पिल्लाच्या अंगाभोवती पट्टा गुंडाळल्यानंतर त्यास दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. बाहेर निघताच पिल्लाने नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली. 

उपवनसंरक्षक सावंतवाडी एस एन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) वनविभाग सावंतवाडी व कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे, वनपाल नेरूर धुळु कोळेकर वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनपाल मठ सावळा कांबळे, वनरक्षक कुडाळ संजीव जाधव, वनमजूर कदम, वाईल्ड लाईफ रेस्क्यू इमर्जन्सी संस्थेचे अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सिद्धेश ठाकूर, स्थानिक ग्रामस्थ नितीन वेंगुर्लेकर, अण्णा तेली, आबा भोगले व पोलीस पाटील तेंडोली नाईक यांनी यशस्वी केली.

Web Title: The rescue team of Forest area Kudal gave life to a gaur that fell in a well in Tendoli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.