sindhudurg: पहिल्याच पावसात शाळेचे छप्पर कोसळले, शाळा बंद असल्याने दुर्घटना टळली

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 12, 2023 01:22 PM2023-06-12T13:22:25+5:302023-06-12T13:23:31+5:30

बांदा ( सिंधुदुर्ग ) : मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे मोडकळीस आलेले छप्पर रविवारी मध्यरात्री पहिल्या ...

The roof of the school collapsed in the first rain, the accident was averted as the school was closed | sindhudurg: पहिल्याच पावसात शाळेचे छप्पर कोसळले, शाळा बंद असल्याने दुर्घटना टळली

sindhudurg: पहिल्याच पावसात शाळेचे छप्पर कोसळले, शाळा बंद असल्याने दुर्घटना टळली

googlenewsNext

बांदा (सिंधुदुर्ग) : मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे मोडकळीस आलेले छप्पर रविवारी मध्यरात्री पहिल्या पावसात कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसांतच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, शिक्षण विभाग अधिकाऱ्यांच्या चालढकल कारभारामुळे दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती.

मडुरा शाळा नं. १ ची सुद्धा अशीच अवस्था आहे. धोकादायक इमारतीमुळे त्याठिकाणी प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत नाही. मडुरा सरपंच उदय चिंदरकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, दिनेश नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. दोन दिवसांतच शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने छप्पराची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: The roof of the school collapsed in the first rain, the accident was averted as the school was closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.