चित्रपटातील कथा नाही वास्तव! १५ वर्षापुर्वी झाले होते बेपत्ता, वटपौर्णिमेदिवशी पत्नीला मिळाले सौभाग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:15 PM2022-06-21T18:15:12+5:302022-06-21T18:15:32+5:30

देवगड पं.स.कार्यालयातून किरकोळ रजा टाकून गेले ते घरी परत आले नाही.त्यांचा घरातील मंडळींनी शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही यामुळे दि. ६ ऑगस्ट २००६ रोजी त्यांची पत्नी उमा सुर्यकांत पाटील यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली होती.

The search for Suryakant Patil, a senior assistant in Devgad Panchayat Samiti started after 15 years | चित्रपटातील कथा नाही वास्तव! १५ वर्षापुर्वी झाले होते बेपत्ता, वटपौर्णिमेदिवशी पत्नीला मिळाले सौभाग्य

चित्रपटातील कथा नाही वास्तव! १५ वर्षापुर्वी झाले होते बेपत्ता, वटपौर्णिमेदिवशी पत्नीला मिळाले सौभाग्य

Next

देवगड : देवगड पंचायत समितीत वरिष्ठ सहाय्यक सेवेत असलेले कर्मचारी ऑगस्ट २००६ मध्ये बेपत्ता झाले होते. त्यांचा नाशिकमध्ये शोध लागला. देवगड पं.स.मधून १५ वर्षापुर्वी किरकोळ रजा टाकून गेलेले सुर्यकांत पाटील  घरी परतले नाही. यामुळे घरातील पत्नी,  मुले अन्य नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेवूनही ते मिळाले नाहीत. अखेर १५ वर्षांनी नाशिक निफाडमध्ये सुर्यकांत पाटील यांचा शोध लागला. निफाड येथील बाळासाहेब पाखरे आणि विजय खालकर हे शिक्षक. त्यांच्या प्रयत्नांमुळेच वटपौर्णिमेदिवशी एका पत्नीला आपले सौभाग्य १५ वर्षांनी मिळाले तर दोन्ही मुलांना त्यांचे बाबा मिळाले आहेत.

देवगड पं.स.मध्ये सेवेत असलेले वरिष्ठ सहाय्यक सुर्यकांत मनोहर पाटील हे पत्नी व दोन मुलांसह देवगड येथे राहत होते.त्यांचे मुळ गाव राजापूर रत्नागिरी येथील असून त्यांची पत्नी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे परिचारिका म्हणून सेवेत होती.पाटील हे दि. ३ ऑगस्ट  २००६ रोजी  किरकोळ रजा टाकून १५ वर्षापुवी देवगड पं.स.कार्यालयातून किरकोळ रजा टाकून गेले ते घरी परत आले नाही.त्यांचा घरातील मंडळींनी शोध घेतला मात्र त्यांचा शोध लागला नाही  यामुळे दि. ६ ऑगस्ट २००६ रोजी त्यांची पत्नी उमा सुर्यकांत पाटील यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलिस स्थानकात दिली होती.

दैवी चमत्कार तर नाही ना..

ते बेपत्ता झाल्यानंतर बरीच वर्षे गेली.त्यांचा शोध न लागल्याने ते मिळतील ही आशा त्यांचा कुटूंबियांनी सोडून दिली.त्यांची पत्नीही सेवानिवृत्त झाली होती.मुले मोठी झाली अन् त्यांचा मार्गाला लागली.अन् अचानक त्यांना फोन जातो तुमचे पप्पा तुमच्याशी बोलू इच्छितात.. हे ऐकून मुलांचा घटनेवर विश्वासच बसत नव्हता, पण नियतीने घडवून आणलेला सुखद अनुभव मुंबई आणि गोवास्थित मुलांना आला.त्यांचा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर गोवा येथे नोकरीला असून मुलगी आयटी झाली आहे व अंधेरी येथे नोकरीला आहे.आई कणकवली येथे राहत आहे.वडीलांची बातमी समजताच  मुलांनी थेट निफाड गाठले. बाबांना पाहताच त्यांना आनंद झाला. हा दैवी चमत्कार तर नाही ना, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली.

एखाद्या चित्रपटाप्रमाणे कथा

एखाद्या चित्रपटातील कथानकासारख्या टप्प्याटप्प्याने ही कथा घडली.चित्रपटासारखे कथेसारखीच घडलेल्या या वास्तवादी कथेची माहिती अशी देवगड पं.स.मध्ये शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक म्हणून सुर्यकांत पाटील हे सेवेत होते.३ ऑगस्ट २००६ रोजी कार्यालयात किरकोळ रजा टाकून ते निघाले मात्र कधीही घरी परतलेच नाहीत.पत्नी, मुले, नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला मात्र ते सापडलेच नाहीत.सुर्यकांत पाटील  त्या कालावधीत पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, पंजाब आदी ठिकाणी तीर्थस्थळांना राहील्यानंतर नाशिक पंचवटी येथे निवारा केंद्रात आश्रय घेत होते. ते ३ जुनला नाशिक रोडला रस्त्याने जात असताना निफाडचे प्राथमिक शिक्षक बाळासाहेब पाखरे यांना ते विमनस्क स्थितीत दिसले त्यांनी पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर थोडेफार त्यांना सांगता आले.पाखरे यांनी त्यांचे मित्र विषयतज्ञ विजय खालकर रा.निफाड यांना सांगीतले.

खालकर यांनी याबाबत माहिती घेवून शोध घेण्याचा प्रयत्न केला.हे करीत असताना रत्नागिरी,सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही मित्रपरिवार तसेच कार्यकर्ते यांना संपर्क करून पाटील यांच्या कुटूंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतू देवगड परिसरात पाटील कुटूंबियांपैकी कोणीही राहत नसल्याने संपर्क होत नव्हता.खालकर यांनी मित्रांशी संपर्क साधून देवगड पं.स.शिक्षण विभागाशी संपर्क केला.  हे सर्व घडल्यानंतर १३ जुन रोजी पाटील यांचे कुटूंबीय त्यांना घेण्यासाठी नाशिककडे निघाले.

दरम्यानच्या काळात सुर्यकांत पाटील यांची सर्व व्यवस्था खालकर व पाखरे यांचे कुटूंबीय व मित्रपरिवार पाहत होते.अखेर पाखरे यांचे कुटूंबीय मंगळवारी १४ जुन रोजी निफाड येथे पोहचले.वडीलांना पाहताच मुलांचा स्वत:चा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.सुर्यकांत पाटील व त्यांचे कुटूंबीय तब्बल १५ वर्षे १० महिने ११ दिवसांनी भेटले.त्यांनी पती पत्नी व वडील मुले यांच्यात झालेली ताटातुट संपवून पुर्नभेट घडवून आणणा-या पाखरे व खालकर यांचे व त्यांचे कुटूंब, मित्रपरिवार यांचे आभार मानून वडीलांना घेवून घरी रवाना झाली.

Web Title: The search for Suryakant Patil, a senior assistant in Devgad Panchayat Samiti started after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.