निष्ठावंत म्हणवणारे लवकरच शिंदे गटात येतील, सामंतांनी सांगितलं राजकारण
By अनंत खं.जाधव | Published: September 3, 2022 08:34 PM2022-09-03T20:34:55+5:302022-09-03T20:36:02+5:30
सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तेही नजिकच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत आहोत असे म्हणणारे देखील महिनाभरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही यावेळी मंत्री सामंत म्हणाले. मंत्री सामंत हे तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून वेंगुर्ले येथील आपल्या निवासस्थानी गणेश चतुर्थी दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तेही नजिकच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कॅण खरे निष्ठावंत तुम्हाला कळतील आम्ही भाजपमध्ये जाण्याचा येत प्रश्न नाही. शिवसेनेतच आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी घटना केली आहे. त्यात हिंदुत्ववादाची व्याख्या सांगितली आहे, त्यानुसार हिंदुत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विचाराने आम्ही पुढे नेत आहोत असे सामंत म्हणाले.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट प्रबळ दावेदार आहे आणि टीका करणारे कुठेच नाहीत, असे त्यांनी सांगितले. शिंदे गट असे आम्ही कधीच म्हटले नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत, असे त्यांनी सांगितले.येत्या काळात शिवसेनेचा विचारच पुढे जाईल मी कुणावरही टिका करणार नाही.असे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.