Sindhudurg: बाजारात जाण्यावरून वाद, रागात मुलानेच घेतला जन्मदात्रीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 12:14 PM2024-10-16T12:14:12+5:302024-10-16T12:14:36+5:30

ओरोस : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. रागाच्या - संतापाच्या भरात मुलाने आईचा गळा ...

The son strangled his mother to death in an argument over going to the market in Kudal Sindhudurg district | Sindhudurg: बाजारात जाण्यावरून वाद, रागात मुलानेच घेतला जन्मदात्रीचा बळी

Sindhudurg: बाजारात जाण्यावरून वाद, रागात मुलानेच घेतला जन्मदात्रीचा बळी

ओरोस : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. रागाच्या - संतापाच्या भरात मुलाने आईचा गळा दाबल्याने ती जागीच गतप्राण झाली. ही घटना कुडाळ तालुक्यातील कसाल बौद्धवाडी येथे सोमवारी (दि. १४) रात्री घडली. मनोरंजना मोहन कदम (वय५८) असे खून झालेल्या मातेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा संशयित सुरेंद्र मोहन कदम (४०) याला अटक करण्यात आली आहे.

१४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास बाजारात जाण्याच्या कारणावरून कसाल बौद्धवाडी येथील घरासमोरील अंगणात मुलगा सुरेंद्रने आई मनोरंजना यांच्यात वाद झाला त्यातून सुरेंद्रने आई मनोरंजना यांना हाताचे थापटाने मारले. त्या अंगणातील गवतात जाऊन पडल्या. तेथेही सुरेंद्रने आईच्या कानफटात मारून आंब्याच्या झाडाजवळ पाडले. त्यावेळी सुरेंद्रने आणलेली घरातील विहिरीतील पाणी काढण्याच्या दोरीच्या साह्याने गळा आवळून ठार मारले.

त्यानंतर तो बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिस तेथे पोहोचले त्यांनी सुरेंद्रला ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली दोरी पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरीचे पोलिस शैलेश सोनसुरकर यांनी दिली. संशयित सुरेंद्र मोहन कदम याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: The son strangled his mother to death in an argument over going to the market in Kudal Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.