मालवण पर्यटन महोत्सव 'जल्लोष २०२२' अंतर्गत नौकानयन स्पर्धेचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:47 PM2022-05-13T17:47:35+5:302022-05-13T17:47:54+5:30
सिंधुदुर्ग : मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून ...
सिंधुदुर्ग : मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुढील तीन दिवस हा महोत्सव सुरु राहणार आहे. या महोत्सवा दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दांडी समु्द्रकिनारी नौकानयन स्पर्धा अंतर्गत १८ फुट फायबर बोट वल्हवण्याची स्पर्धा घेण्यात आली. पर्यटक व स्थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्पर्धेचा थरार अनुभवला. स्पर्धेच्या निमित्ताने मच्छिमारांनी आपले नौकानयन कौशल्य आणि ताकद पणाला लावून सर्वांचीच वाहवा मिळवली.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्या हस्ते झाले. नौकानयन स्पर्धेत एकुण पाच संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघात ३ स्पर्धकांचा समावेश होता.