Sindhudurg: मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून महिला जागीच ठार, दोघे जखमी; सावंतवाडीतील घटना

By अनंत खं.जाधव | Published: February 14, 2024 05:59 PM2024-02-14T17:59:44+5:302024-02-14T17:59:56+5:30

पती समोर पत्नीचा मृत्यू

The woman died on the spot after being trapped under the mud pile, two injured in Sawantwadi | Sindhudurg: मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून महिला जागीच ठार, दोघे जखमी; सावंतवाडीतील घटना

Sindhudurg: मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून महिला जागीच ठार, दोघे जखमी; सावंतवाडीतील घटना

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर निवासी संकुलाचे काम सुरू असून या कामासाठी स्वार हाॅस्पीटलच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची माती काढत असताना अचानक तिघांवर मातीचा ढिगारा कोसळला. यात ढिगाऱ्याखाली अडकून एक महिला जागीच ठार झाली. तर दोघांना वाचविण्यात यश आले. 

शारूबाई गोविंद राठोड (वय ३२ मूळ रा.विजापूर कर्नाटक सध्या. सावंतवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची ही प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. गोविंद राठोड (३६), चांदुबाई दीपक जाधव (३३) अशी जखमींची नावे आहेत.

सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर एका निवासी संकुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी स्वार हॉस्पीटलच्या बाजूच्या भितीची असलेली माती काढण्यात येत होती. त्याच वेळी तिथे काही कामगार काम करत होते. दरम्यान, बाजूच्या भितीचा ढिगारा कोसळून शारूबाई राठोड, गोविंद राठोड, चांदुबाई जाधव या ढिगाऱ्याखाली अडकल्या.

याघटनेनंतर कामगारांनी धावाधाव करून नागरिकांना बोलवले तसेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने ढिगारा बाजूला करण्यात आला. यात शारूबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद राठोड व चादूबाई जाधव या दोघांनी आपला जीव कसाबसा वाचवला. किरकोळ जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या अचानक घडलेल्या दुर्घटनेनंतर महिलांनी तर एकच टाहो फोडला. शारूबाई ही पतीसह या इमारतीच्या कामाला होती. तिली दोन मुली आहेत.

पती समोर पत्नीचा मृत्यू

मातीचा ढिगारा खाली आला तेव्हा तिघे तेथे काम करीत होते. यात मृत शारूबाई सोबत पती गोविंद हा ही होता. पण त्याने पत्नीला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. अन् पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू झाला. तो ही यात जखमी झाला असून त्याला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: The woman died on the spot after being trapped under the mud pile, two injured in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.