...तर ‘युबी’च्या जमिनीचा लिलाव

By admin | Published: March 22, 2016 11:43 PM2016-03-22T23:43:15+5:302016-03-22T23:43:15+5:30

याठिकाणी अलिशान १३ वातानुकुलित बंगले, टेनिसकोर्ट व अद्ययावत कॅन्टीन करण्यात आले असल्याचे दिसले.

... then the 'UB' land auctioned | ...तर ‘युबी’च्या जमिनीचा लिलाव

...तर ‘युबी’च्या जमिनीचा लिलाव

Next

चिपळूण : पिंपळी बुद्रुक येथे युबी इंजिनिअरिंग या कंपनीच्या नावे असलेल्या २०९ गुंठे म्हणजे ५ एकरपेक्षा जास्त जमिनीवर १३ वातानुकुलित बंगल्यांची व इतर मालमत्तेची तहसीलदार वृषाली पाटील यांनी आज मंगळवारी पाहणी केली व तेथे जप्तीची नोटीस चिकटवली. ही जमीन जप्त करण्यात आली आहे.मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी अनेक बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले आहे. पिंपळी येथील युबीआयएल कंपनी मल्ल्या यांच्या मालकीची असावी, अशी चर्चा आहे. या कंपनीने २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षांचा ४५ हजार रुपये बिनशेती कर भरलेला नाही. त्यामुळे सोमवारी सायंकाळी तहसीलदार पाटील यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी दिवाकर केळुस्कर व तलाठी शुभांगी गोंगाणे यांनी ही मालमत्ता जप्त केली आहे.
आज या घटनास्थळी तहसीलदार पाटील यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांसह भेट दिली. याठिकाणी अलिशान १३ वातानुकुलित बंगले, टेनिसकोर्ट व अद्ययावत कॅन्टीन करण्यात आले असल्याचे दिसले. कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी आलेले परदेशातील अधिकारी या बंगल्यात राहात असल्याची माहिती मिळाली आहे. तहसीलदार पाटील यांनी येथे रितसर कारवाईची नोटीस चिकटवली. १५ दिवसात कर भरला नाही, तर या जागेचे व बंगल्यांचे मूल्यांकन करुन लिलाव केला जाईल, अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


जप्ती टळणार?
चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथील युबी इंजिनिअरिंग कंपनीची जागा महसूल विभागाने जप्त केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने थकीत ४५ हजारांचा कर भरण्याची तयारी महसूल विभागाकडे दर्शवली असल्याने ही रक्कम भरल्यास जप्तीची कारवाई होणार नाही, असे महसूलच्या सुत्रांकडून समजते. ही कंपनी विजय मल्ल्या यांच्या मालकीची आहे किंवा कसे याबाबत कंपनीचे अधिकारी येथे आल्यानंतरच स्पष्ट होईल.

तहसीलदार वृषाली पाटील यांनी आज केली पाहणी.
कंपनीतील इमारतीवर जप्तीची नोटीस चिकटवली.
वातानुकुलित १३ बंगले टेनिसकोर्टसह कॅन्टीन अस्तित्त्वात.
युबीआयएल या कंपनीच्या मालकीची आहे २०९ गुंठे जागा.
कोयनेच्या चौथ्या टप्प्यातील परदेशी अधिकाऱ्यांचे येथील बंगल्यात वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे.

जप्ती टळणार?
चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथील युबी इंजिनिअरिंग कंपनीची जागा महसूल विभागाने जप्त केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने थकीत ४५ हजारांचा कर भरण्याची तयारी महसूल विभागाकडे दर्शवली असल्याने ही रक्कम भरल्यास जप्तीची कारवाई होणार नाही, असे महसूलच्या सुत्रांकडून समजते. ही कंपनी विजय मल्ल्या यांच्या मालकीची आहे किंवा कसे याबाबत कंपनीचे अधिकारी येथे आल्यानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: ... then the 'UB' land auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.