...तर आमदारकी सोडून वैभव नाईक नगरपंचायत निवडणूक लढवतील!; समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा पलटवार 

By सुधीर राणे | Published: May 5, 2023 04:38 PM2023-05-05T16:38:44+5:302023-05-05T16:39:42+5:30

कणकवली : कणकवली येथील जुन्या भाजी मार्केट जवळील सुलभ शौचालयाची नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकानुसारच बनवण्यात येत आहे. ...

then Vaibhav Naik will leave MLA and contest Nagar Panchayat election; Counter attack by Sameer Nalavde, Bandu Harne | ...तर आमदारकी सोडून वैभव नाईक नगरपंचायत निवडणूक लढवतील!; समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा पलटवार 

...तर आमदारकी सोडून वैभव नाईक नगरपंचायत निवडणूक लढवतील!; समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा पलटवार 

googlenewsNext

कणकवली: कणकवली येथील जुन्या भाजी मार्केट जवळील सुलभ शौचालयाची नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकानुसारच बनवण्यात येत आहे. त्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने  खर्च वाढला आहे. मात्र, कणकवलीत चांगली विकासकामे आम्ही केल्यामुळेच विरोधकांना आता पोटशूळ उठला असल्याचे  प्रत्युत्तर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिले आहे. तसेच विकासकामात एवढे पैसे मिळत असतील तर आमदारकी सोडून वैभव नाईक कणकवलीत नगरपंचायत निवडणूक लढतील,असा टोलाही समीर नलावडे यांनी यावेळी लगावला. 

कणकवली खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, अजय गांगण आदी उपस्थित होते.

बंडू हर्णे म्हणाले, कणकवली नगरपंचायतच्या कामांवर विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. कणकवलीत सुलभ शौचालय बांधण्याचे काम केले जात आहे.त्याबाबत जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे.म्हणूनच आम्ही त्याबाबतची माहिती देत आहोत. गेली पाच वर्ष सुशांत नाईक,कन्हैया पारकर  विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत.राज्यात त्यांची  सत्ता असताना ते काहीही बोलू शकलेले नाहीत.आमच्या कामाची दखल घेवून राज्यात कणकवली नगरपंचायतला एक नंबर देण्यात आला आहे.त्याबद्दल विरोधकांना पोटशूळ उटल्याने ,ते जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेताल आरोप करत असल्याचे बंडू हर्णे यावेळी म्हणाले. 

सुलभ शौचालय बांधकामाचा जीएसटी व अन्य कर वगळता अंदाजपत्रक ६९ लाख ९३ हजार आहे.संपूर्ण बांधकाम ८०२ स्क्वेअर फूटचे आहे. वरचा मजला ५७५ स्क्वेअर फूट असून त्यात पत्रा शेड आणि किचन आहे. तळमजल्यावर पुरुष, स्त्रियांसाठी वेगवेगळी स्वछता गृहे, मोठी आरसीसी वॉटर प्रुप सेफ्टी टॅंक, सेफ्टी वॉल यासारखी कामे होतील. त्यामुळे तळ मजल्याचे सिव्हील वर्क मध्ये ३६८३ रुपये दराप्रमाणे काम होणार आहे. स्वच्छता गृह तसेच अपंगांसाठी वेगळी व्यवस्था आहे. या शौचालयाचे काम अत्यंत अद्ययावत पद्धतीने केले जाणार आहे असे बंडू हर्णे म्हणाले.

समीर नलावडे म्हणाले, शिवसेनेचे खासदार आणि आमदार कार्यरत आहेत, जर ते चुकीचे काम असेल तर खरोखर चौकशी लावावी. आम्ही तयार आहोत. जनतेसमोर खोटे बोलायचे, मात्र, रेटून बोलायचे अशी सवय सुशांत नाईक आणि कन्हैया पारकर यांची आहे. देवाकडे प्रार्थना करूनही ते सत्तेवर येणार नसल्याने आरोप करून आमची बदनामी करण्याचा हा विरोधकांचा खटाटोप आहे.

विरोधी पक्ष म्हणून आरोप करण्याची त्यांची जबाबदारी होती. ती ते पार पाडत आहेत. आता ५ वर्ष झाल्याने सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत. कणकवली नगरपंचायतमध्ये एवढे पैसे जर मिळत असतील तर वैभव नाईक आमदारकी सोडून कणकवलीत निवडणुकीला उभे राहतील. यापुर्वी शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार आणि आमदारानी रेल्वे स्टेशनजवळ उद्यान करणार असा शब्द दिला होता.

पारकर आणि नाईक यांनी एस टी स्टँड विकसित करून भाजीवाल्याना गाळे देणार असे जाहीर केले होते. त्याचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणावेळी वैभव नाईक, पारकर यांनी विरोध केला होता. आमच्या ताकदीवर त्याचे स्थलांतरण आम्ही करुन दाखवले. आता ते मोर्चाची भाषा करत आहेत. त्यांनी यावे आम्ही तयार आहोत.

सनराईज टॉवर मध्ये जागेसाठी सुशांत नाईक यांच्याकडे अनेकानी लाखो रुपये गुंतवले आहेत. त्या गाळ्यांची 'ओसी' होत नाही. त्या विरोधात मी लवकरच आंदोलन छेडणार आहे.नाईक यांनी लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप समीर नलावडे यांनी यावेळी केला.

Web Title: then Vaibhav Naik will leave MLA and contest Nagar Panchayat election; Counter attack by Sameer Nalavde, Bandu Harne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.