कणकवलीत राजकारणी तर आहेतच, आता चांगले खेळाडू घडतील; नारायण राणेंची मिश्किल टिपणी 

By सुधीर राणे | Published: March 18, 2023 04:18 PM2023-03-18T16:18:14+5:302023-03-18T16:19:00+5:30

कणकवली: कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी आश्वासने गेल्या पाच वर्षांपूर्वी आम्ही दिली होती, ...

There are politicians in Kankavli, now there will be good sportsmen; A difficult remark by Narayan Rane | कणकवलीत राजकारणी तर आहेतच, आता चांगले खेळाडू घडतील; नारायण राणेंची मिश्किल टिपणी 

कणकवलीत राजकारणी तर आहेतच, आता चांगले खेळाडू घडतील; नारायण राणेंची मिश्किल टिपणी 

googlenewsNext

कणकवली: कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. जी आश्वासने गेल्या पाच वर्षांपूर्वी आम्ही दिली होती, ती पूर्ण केली आहेत. शहरातील रस्ते आणि विकासकामे गतीने सुरु आहेत. शहरातील खेळाडूंसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स हे एक दालन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळाडू सराव करतील असे सांगतानाच कणकवलीत अनेक राजकारणी तर आहेतच, पण आता चांगले खेळाडूही घडतील अशी मिश्किल टिपणी केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.

कणकवलीच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते आज, शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, अबिद नाईक, रवींद्र गायकवाड, ऍड.विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, उर्वी जाधव, मेघा सावंत, कविता राणे,  मुख्याधिकारी अवधूत तावडे, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, शहरात रस्ते आणि चांगल्या नागरी सुविधा आम्ही देत आहोत. नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभत आहे. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांचे काम कौतकास्पद आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे शहरातील तरुणांना बॅडमिंटन, कबड्डी असे इनडोअर गेम खेळण्यासाठी  हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा होण्याच्या दृष्टीने हे स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार केले आहे. तर कणकवलीच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने बारमाही वाहणारा धबधबा जानवली नदीवरील गणपती साना या ठिकाणी केला जाणार असल्याचा आनंद असल्याचेही मंत्री राणे यावेळी म्हणाले. तसेच पुढील पाच वर्षे नगरपंचायतीत सत्ता द्या शहराचा उर्वरित विकासही करू असेही ते म्हणाले.

राणे बंधूंकडून बॅडमिंटनचे प्रदर्शन!

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे आणि त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनी या नूतन स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या लोकार्पण सोहळ्यानंतर बॅडमिंटन खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांच्या खेळाला चांगली दाद दिली.मंत्री नारायण राणे यांनीही बॅडमिंटनचा आनंद लुटला.

Web Title: There are politicians in Kankavli, now there will be good sportsmen; A difficult remark by Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.