रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत अद्यापही गूढ कायम; लोकसभेसाठी नारायण राणे, किरण सामंत यांची नावे चर्चेत

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 14, 2024 02:13 PM2024-03-14T14:13:34+5:302024-03-14T14:15:38+5:30

किरण सामंत यांच्याकडून प्रचार सुरू

There is no announcement about Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency yet, Names of Narayan Rane, Kiran Samant in discussion | रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत अद्यापही गूढ कायम; लोकसभेसाठी नारायण राणे, किरण सामंत यांची नावे चर्चेत

रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत अद्यापही गूढ कायम; लोकसभेसाठी नारायण राणे, किरण सामंत यांची नावे चर्चेत

सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील एकुण ४८ जागांपैकी भाजपाच्या वाट्याच्या जागा आणि मागच्या वेळी त्यांचे विद्यमान खासदार विजयी झालेले होते त्या जागांवर दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये भाजपाने पाच विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे. मात्र, बहुचर्चित रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे या जागेबाबतचे गूढ अद्याप कायम आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लाेकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गटाचे किरण उर्फ भैय्या सामंत यांनी उमेदवारी मिळते ? की भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देते ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपाने लोकसभेच्या एकुण ५४३ जागांपैकी दुसरी यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील भाजपाच्या २० विद्यमान खासदारांच्या जागेवर हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या २० जागांपैकी पाच जागांवर भारतीय जनता पार्टीने विद्यमान पाच खासदारांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा विद्यमान खासदारांना धक्काच मानला जात आहे.

भाजपचाच उमेदवार

संपूर्ण कोकणसह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या तळकोकणातील जागेवर भारतीय जनता पार्टी उमेदवार जाहीर करेल अशी आशा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटत होती. या ठिकाणी विद्यमान केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंचे नाव चर्चेत आहे. परंतु वेगवेगळ्या तर्कविर्तकानुसार या जागेचे गुढ कायम असल्याचे दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार या जागेवर लढणार असे गोव्याचे मुख्यमंत्री यांनी सावंतवाडीतील भाजपाच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. त्यामुळे आता ही जागा केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

किरण सामंत यांच्याकडून प्रचार सुरू

शिवसेनेकडून येथे शिवसेनेचाच उमदेवार असेल आणि किरण सामंत या ठिकाणी लढतील असे स्पष्ट केल्यानंतर निश्चितच सामंत यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. मात्र किरण सामंत हे सध्या महायुतीचाच उमेदवार असेल आणि तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जात त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. तर कार्यकर्त्यांसाठी रत्नागिरीतून खास प्रचारासाठी विशेष गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे किरण सामंत हे लढणार असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: There is no announcement about Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency yet, Names of Narayan Rane, Kiran Samant in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.