महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:38 AM2018-08-13T00:38:07+5:302018-08-13T00:38:40+5:30

शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली.

There is no impact on Sawantwadi that highway goes out of the City | महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

महामार्ग बाहेरून गेल्याचा सावंतवाडीवर परिणाम नाही, केसरकर-साळगावकर यांचे एकमत 

googlenewsNext

 सावंतवाडी - शहरातून रस्ता न जाता तो बाहेरून गेल्यामुळे बाजारपेठेवर कोणताही परिणाम झाला नाही. रोजगार आला की विकास आपणच होतो, असे उद्गार नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले. त्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साळगावकरांचीच री पुढे ओढली. यापुढे सावंतवाडी उद्योगात रोल मॉडेल असेल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच साळगावकरांच्या संकल्पनेतील विकास परिषद आपल्या अध्यक्षतेखाली होण्यासही मंत्री केसरकर यांनी हिरवा कंदिल दर्शविला आहे.

एका खासगी कार्यक्रमासाठी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह नगराध्यक्ष बबन साळगावकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या सत्तर वर्षात विकास झाला नाही. तो विकास आता होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन विकासाची दिशा ठरवूया, असे सांगितले. तसेच सावंतवाडीच्या बाहेरून रस्ता गेला म्हणजे सावंतवाडीतील धंदा कमी झाला असे होत नाही. आता नव्याने वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. ते प्रकल्प रोजगाराबरोबरच विकासाला दिशा देणारे ठरतील, अशी अपेक्षाही साळगावकर यांनी व्यक्त करत आम्ही विकास परिषद घेतो ती तुमच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी अपेक्षा व्यकत केली.
यावेळी बोलतना मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये रोजगाराचे एक नवे पर्व सुरू होत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. सावंतवाडीजवळ चष्म्याचा कारखाना तसेच डाटा सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. यातून थेट पाचशे महिलांना सावंतवाडीत रोजगार मिळेल. तर इतर ठिकाणी रोजगार मिळेल तो वेगळाच आहे. त्या शिवाय आपला आयएएस व आयएपीएस सेंटरही लवकरच मार्गी लागणार आहे. सिंधुदुर्गचा झपाट्याने विकास होत असताना चिपीमध्ये पहिले विमान १२ सप्टेंबरलाच येणार आहे. माल्टातून पहिले विमान चिपीला येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग पर्यटनात अग्रेसर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सावंतवाडी ही विकासाचे रोल मॉडेल करत असतानाच बाहेरून रस्ता गेला म्हणजे धंदा होत नाही असे नाही. मात्र आता ती मानसिकता सर्वांनी सोडून देऊन नवीन स्वीकारण्याची तयारी ठेवूया. रोजगारातून विकास साधूया, असे सांगत यापुढे सावंतवाडीतील शिल्पग्राम तसेच हेल्थ फार्म सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. 
 
७२ कोटीचा निधी मागे जाणार होता
सिंधुदुर्गमध्ये मागील वर्षातील ७२ कोटीचा निधी मागे जाणार होता. पण तो मी दोन महिन्यांसाठी थांबवला आणि तो खर्ची पडत आहे. हे मी अर्थराज्य मंत्री असल्याने शक्य झाले, अन्यथा निधी मागे गेला असता. अधिकाºयांनीही आता चांगले काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त 

Web Title: There is no impact on Sawantwadi that highway goes out of the City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.