तपासात प्रगती नाही

By Admin | Published: March 31, 2015 09:23 PM2015-03-31T21:23:23+5:302015-04-01T00:09:32+5:30

पेढीतील चोरी : खेड शहरात नागरिकांमध्ये घबराट

There is no progress in the investigation | तपासात प्रगती नाही

तपासात प्रगती नाही

googlenewsNext

खेड : खेड शहरातील संजय दत्तात्रय दांडेकर या सराफी दुकानात खरेदीस गेलेल्या ग्राहकाच्या पिशवीतील ७० हजार रूपये किंमतीचे दागीने चोरीस गेल्याप्रकरणी अद्याप तपासात गती मिळाली नाही़ पोलिसांनी तातडीने तपास करणे आवश्यक असतानाच चोरी झाल्याची माहिती मिळताच कोणतीही तत्परता दाखवली नसल्याने ‘त्या’ संशयित ४ महिला निसटून गेल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान वारंवार होत असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी आता महिलांना असुरक्षितता वाटत असून खेड पोलिसांनी आपली कार्यक्षमता सिध्द करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान या चोरीबाबत सोमवारी खतिजा आपली फिर्याद दाखल करण्यास गेल्या असता त्यांनी तातडीने ती दाखल न करता उशिरा दाखल करून घेतल्याचे समजते.
सोमवारी खेड शहरातील सोनारआळी येथील संजय दत्तात्रय दांडेकर यांच्या दुकानामध्ये जुने सोन्याचे दागिने देऊन नवे सोन्याचे दागीने खरेदी करण्याच्या हेतूने आलेली महिला ग्राहक खतिजा लियाकत देशमुख (वय ४५ रा़ खेड) या दुकानाच्या काउंटरसमोर उभ्या होत्या़ याचवेळी ५ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी आपल्यासोबत आणले होते़ यामध्ये १ तोळे वजनाच्या २ सोन्याच्या बांगड्या, १ तोळे वजनाचे ५ कानातील जोड, १ तोळे वजनाचे ५ सोन्याची रिंग, १ ग्रॅम वजनाची खडयाची कुडी, २ ग्रॅम वजनाची अंगठी आणि सोन्याची १ चेन असा ५ तोळयांचा ७० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज खतिजा यांनी आपल्यासोबत आणला होता. यावेळी दांडेकर यांच्याशी ‘त्या’ चर्चा करीत असतानाच दांडेकर यांना दागीने दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या हातातील पिशवीतून जुने दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता, दागिने ठेवलेली लहान पर्स गायब झालेली आढळून आली़ त्यांनी लागलीच दांडेकर यांना ही बाब सांगितली. तेथील सर्व लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, तो निरर्थक ठरला़ मात्र त्यावेळी काउंटरसमोर अन्य ४ महिला उभ्या असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी आपली तपासाची दिशा वळवल्याचे समजते. दरम्यान ज्याप्रकारे ही चोरी झाली त्या प्रकारे पोलिसांनीही तत्परता दाखवणे आवष्यक होते. मात्र, तसे झाले नाही़ यामुळेच चोरट्या महिलांना उत्तेजन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी चार महिला खेड बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र ही चोरी त्यांनीच केली अथवा नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

Web Title: There is no progress in the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.