सावंतवाडीत पाणी कपात नाही : बबन साळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:26 AM2019-06-03T11:26:24+5:302019-06-03T11:28:46+5:30
पाळणेकोंड धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस उशिरा असला तरी पुढील ४५ दिवस शहरवासीयांना कोणतीही भीती नाही, तसेच पाणी कपात होणार नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
सावंतवाडी : पाळणेकोंड धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस उशिरा असला तरी पुढील ४५ दिवस शहरवासीयांना कोणतीही भीती नाही, तसेच पाणी कपात होणार नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.
पाळणेकोंड धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातोच तसेच आजूबाजूच्या तीन गावांना ही नगरपालिका पाणी पुरवठा करत असते. ते पाणी पालिका कपात करणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहर पाण्याने स्वयंपूर्ण आहे. शहराला पाळणे कोंड धरण तसेच केसरी येथील नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा होत असतो. दरवर्षो पाणीसाठा कमी असायचा पण यावेळी पुरेसा पाणी साठा असल्याने शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट येणार नाही. पाळणेकोंड धरणा त पुढील ४५ दिवस पुरेल एवढा पाणी सध्या शिल्लक आहे.पाउस लांबणीवर पडल्याने शहरावर पाणी संकट येईल का?यांची उत्सुकता सगळ्याना होती पण तसे कोण ते ही संकट येणार नाही.
सावंतवाडी शहराला दरदिवशी १० लाख लीटर एवढे पाणी लागते तर सावंतवाडी नगरपालिका कोलगावला दरदिवशी २ लाख लीटर माजगावला ५० हजार लीटर तर चराठा ६२ हजार लीटर आणि कुणकेरी गावाला १ लाख १४ हजार लिटरचा पाणी पुरवठा करत असते. मात्र गेले काही वर्षे पाऊस लांबला म्हणून पाणी कपात करणे पालिकेला भाग पडले.
पण यावर्षी पाऊस लांबणार असे वाटत असतानाही पालिकेने कोणती पाणी कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल यात कोणतीही शंका नाही. मात्र पाणी मिळते म्हणून जास्त पाण्याचा वापर करू नका. गरज असेल तेवढेच पाणी वापरा, असे आवाहनही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
सावंतवाडी शहरातील २५ घरे ही उंचावर असल्याने तेथे पाणी चढत नाही. पण या घरासाठीही भविष्यात योजना आणणार असून उंचावर टाक्या बसवणार आहे.
नवीन नळपाणी योजनेचा आराखडा ही तयार करण्यात आल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभागी सुकी आदी उपस्थित होते.