वेरवलीत जागेचा वाद पेटला

By admin | Published: October 13, 2015 11:12 PM2015-10-13T23:12:45+5:302015-10-13T23:25:16+5:30

चौघे गंभीर : मिरची पावडर डोळ्यात टाकून काठ्यांनी मारहाण

There was a controversy in space | वेरवलीत जागेचा वाद पेटला

वेरवलीत जागेचा वाद पेटला

Next

लांजा : घरासमोरील जागेत कुंपण घातल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका कुटुंबातील आठजणांनी महिलेला जोरदार मारहाण केली. तिच्या मदतीला आलेल्या अन्य चौघांनाही मारहाण करण्यात आली. मिरचीची पावडर डोळ्यात टाकून लाठ्या-काठ्यांनी प्रहार केल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास वेरवली तेलीवाडीतील करळकर दोन कुटुंबीयांमध्ये हा वाद झाला.या हाणामारीत सखाराम तुकाराम करळकर (वय ५५), गजानन तुकाराम करळकर (५०), जयश्री गजानन करळकर (४५), पूजा गजानन करळकर (२५) यांच्या डोक्यात, हातावर लाठ्यांचे, काठ्यांचे प्रहार केल्याने चौघेही गंभीर जखमी झाले, तर सुगंधा सखाराम करळकर (५५) या किरकोळ जखमी झाल्या.
याबाबत लांजा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार वेरवली, तेलीवाडी येथील गजानन करळकर यांच्या घरासमोरून रस्त्यावर मारुती विठू करळकर यांच्या घराचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्याविरोधात गजानन यांनी आरोग्य विभाग, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
त्यानुसार शासकीय अधिकारी या सांडपाण्याची पाहणी करण्यासाठी सोमवारी वेरवली येथे आले होते. मारुती करळकर यांना याबाबत नोटीसदेखील देण्यात आली होती. याचा राग धरुन मारुती करळकर यांचे कुटुंबीय मंगळवारी दुपारी याच रस्त्यावर कुंपण घालण्यासाठी ठोंबे घालत असताना सुगंधा सखाराम करळकर यांनी मारुती यांच्या कुटुंबीयांना जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सुगंधा हिला मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले.
मात्र पूर्ण तयारीत असणाऱ्या मारुती करळकर यांच्या गटातील लोकांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन गजानन करळकर यांच्या अंगावर चाल केली.
यावेळी महिलांनी घरातील मिरचीची पावडर सोबत आणून मारुती करळकर यांच्या गटाने गजानन करळकर यांच्या गटातील लोकांच्या डोळ्यात टाकली. त्यांना काहीच दिसत नव्हते. याचा फायदा उठवत मारुती करळकर, नीलेश राजाराम करळकर (२९), विलास विठू करळकर (४५), राजे राजाराम करळकर (२५), राजाराम विठु करळकर (६५), साक्षी नीलेश करळकर (२५), विजया विलास करळकर (३५), विनायक विलास करळकर यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन सखाराम, गजानन, जयश्री, पूजा करळकर यांच्या डोक्यात, हातावर लाठ्यांचे, काठ्यांचे प्रहार केले. यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले, तर सुगंधा या किरकोळ जखमी झाल्या.
आजूबाजूच्या लोकांनी या जखमींना दीपक रेडीज यांच्या खासगी गाडीने मनोहर रेडीज यांच्या मदतीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर चारही गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.
या हाणामारीची खबर लांजा पोलीस स्थानकात सुगंधा सखाराम करळकर यांनी दिली असून, सध्या लांजा पोलीस चौकशी करून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिध

Web Title: There was a controversy in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.