Ganpati Festival -गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणार ११ जादा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 02:42 PM2019-08-30T14:42:53+5:302019-08-30T14:44:58+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी दिली. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव आदी उपस्थित होते.
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी १७०० ते १८०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत. २८ रोजी मुंबई व उपनगरातील १२ आगारातून कोकणासाठी ११ जादा गाड्या सुटणार असल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी दिली. यावेळी सहाय्यक वाहतूक अधिकारी ए. बी. जाधव आदी उपस्थित होते.
२९ आॅगस्ट रोजी ५२, ३० रोजी ३७४, ३१ रोजी १४८५, तर १ सप्टेंबर रोजी २७९ जादा गाड्या मुंबईतून सुटणार आहेत.
सर्वाधिक गाड्या ३१ रोजी सुटणार आहेत. रत्नागिरी विभागाकडून प्रवाशांसाठी ९५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत मुंबई मार्गावर या गाड्या धावणार आहेत.
गणेशोत्सवासाठी कशेडी, चिपळूण शिवाजीनगर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून, चिपळुणात क्रेन उपलब्ध ठेवली जाणार आहे. अद्ययावत तीन दुरूस्ती व्हॅन खेड, चिपळूण, रत्नागिरी, ते राजापूर मार्गावर २४ तास तैनात राहणार आहे. याशिवाय महामार्गावरील प्रत्येक आगाराच्या कार्यशाळेत कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. रत्नागिरीत कंट्रोल रूम कार्यान्वित असणार आहे. याशिवाय कशेडी ते खारेपाटणपर्यंत दोन गस्तीपथके २४ तास कार्यरत राहणार आहेत.
याशिवाय प्रत्येक आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, शालेय फेऱ्यादेखील सुटीतही सुरू ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रेल्वेस्थानकांतूनही प्रवाशांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती, प्रभारी वाहतूक नियंत्रक बोगरे यांनी दिली.
नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा गाड्या
यावर्षी मुंबई उपनगरातून कोकणात गणेशोत्सवासाठी नियमित बसेस व्यतिरिक्त कोकणात २२०० जादा गाड्या सोडण्यात येणार असल्या तरीनियमित गाड्यांबरोबर परतीच्या प्रवासासाठी १२७१ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ग्रुप बुकिंगच्या १२३ गाड्या आहेत. ३४१ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ८ सप्टेंबर रोजी ४८७, ९ रोजी ३१०, १० रोजी १९५, ११ रोजी ६५, १२ रोजी ५९, ७ रोजी १५५ गाड्या धावणार आहेत. गतवर्षी १३६६ गाड्या मुंबई मार्गावर सोडण्यात आल्या होत्या.