मालवण विकास आराखड्यात अपेक्षित बदल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:14 PM2020-03-06T15:14:53+5:302020-03-06T15:18:28+5:30

शहर विकास आराखड्याबाबत पालिका स्तरावर हरकती, सूचना घेऊन तसा ठराव करून पाठविण्याचे अधिकार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेस दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना अपेक्षित असलेला बदल आराखड्यात करून बदल केलेला आराखडा शासनास सादर करावा. यात नगररचना अधिकारी मोमीन यांनी पालिकेस सहकार्य करावे, असा आदेशही तनपुरे यांनी दिला आहे, अशी माहिती पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिली.

There will be expected changes in the Malvan development plan | मालवण विकास आराखड्यात अपेक्षित बदल होणार

मालवण विकास आराखड्यात अपेक्षित बदल होणार

googlenewsNext
ठळक मुद्देनगरविकास राज्यमंत्र्यांचे आदेश पालिकेला सूचनांचा ठराव पाठविण्याचा अधिकार

मालवण : शहर विकास आराखड्याबाबत पालिका स्तरावर हरकती, सूचना घेऊन तसा ठराव करून पाठविण्याचे अधिकार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेस दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना अपेक्षित असलेला बदल आराखड्यात करून बदल केलेला आराखडा शासनास सादर करावा. यात नगररचना अधिकारी मोमीन यांनी पालिकेस सहकार्य करावे, असा आदेशही तनपुरे यांनी दिला आहे, अशी माहिती पालिकेचे बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिली.

विकास आराखड्याबाबत तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरविकास उपसचिव बाणाईत, कक्ष अधिकारी खांडेकर, सहायक संचालक (नगररचना) मोमीन उपस्थित होते.

हरकतीचाही पालिकेला अधिकार

मालवण शहर विकास आराखडा शहरवासीयांसाठी अन्यायकारक असल्याचे पटवून देण्यात आले. शहराला आवश्यक नसताना १२, १८, २४ मीटरचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आली आहेत, याची माहिती देण्यात आली. यावर झालेल्या चर्चेअंती तनपुरे यांनी शहर विकास आराखड्यावर सूचना, हरकती घेत तसा ठराव करून पाठविण्याचा अधिकार पालिकेस दिला. लोकांना अपेक्षित असलेला आराखडा तयार करून बदल केलेला आराखडा शासनस्तरावर सादर करावा, अशा सूचना तनपुरे यांनी दिल्या.

Web Title: There will be expected changes in the Malvan development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.