कणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:19 PM2020-12-10T12:19:25+5:302020-12-10T12:22:10+5:30

Pramod Jathar, Highway, Bjp, Kankavli, sindhudurngnews सिंधुदुर्गात महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी गर्डर टाकून उड्डाणपूल करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . या भागात उड्डाणपूलच होणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

There will be a flying bridge in the whole space in Kankavali! | कणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार !

कणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार !

Next
ठळक मुद्देकणकवलीत संपूर्ण जागेत उड्डाण पूलच होणार ! प्रमोद जठार यांचा दावा

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात आले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील रखडलेल्या कामासंदर्भात टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जात आहेत.

सिंधुदुर्गात महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी गर्डर टाकून उड्डाणपूल करण्याबाबत प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे . या भागात उड्डाणपूलच होणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये , भाजपा ओबीसी सेलचे मुंबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र गावकर , क्रीडा भारती अध्यक्ष रवी करमळकर , नगरसेवक शिशीर परुळेकर आदी उपस्थित होते .

प्रमोद जठार म्हणाले, कोरोनामुळे देशभरात अनेक विकासकामांचे फंड आरोग्याच्या बाबीवर वळविण्यात आले आहेत. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे . त्यामुळे ४० कोटी काय ? ४०० कोटी लागले तरी उड्डाणपूलाचे हे काम होईल.

परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचा प्रश्न रखडलेला होता . तेथील जमीन मालक व परशुराम देवस्थानचे ट्रस्टी यांच्यात समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावण्यात आला . तेथे आता चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे . संगमेश्वर मध्ये ४५ मीटर भूसंपादन करण्यात आले होते . मात्र शास्त्री पुलाचे स्ट्रक्चर बदलल्याने तेथे ६० मीटर भूसंपादनाची आवश्यकता भासत होती . त्याबाबतही मार्ग काढण्यात आला असून ४५ मीटरमध्ये काम करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचे प्रणेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रात एपीएमसी मार्केट बंद व दलालांची साखळी तोडण्याबाबत समर्थन करण्यात आले आहे . दलाल माजल्यामुळे भारत बंद चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला . मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी जवान व किसान असल्यामुळेच कोकण व मुंबईत भारत बंदचा फज्जा उडाला आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार जर ठेकेदाराने अटी - शर्ती पाळल्या नाहीत तर त्याला शिक्षा होऊ शकते . यामुळे दलालांचे धाबे दणाणले आहेत . शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून हे विधेयक आणण्यात आले . त्याला शेतकऱ्यांकडूनही पाठिंबा मिळायला हवा .

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे १८ ते २० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत . या तीन दिवसांच्या दौऱ्यात २० डिसेंबर रोजी दौऱ्याच्या संदर्भातील नियोजनाच्या बाबीमध्ये माझ्यावर एक दिवसाचा दिन प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे .त्यामुळे कोकणाचा हा सन्मान करण्यात आला आहे. असेही जठार यावेळी म्हणाले.

जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको !

जनता विकास कामांबाबत प्रगल्भता दाखवते . मात्र तिच प्रगल्भता शिवसेनेच्या खासदारांकडे नाही. जर रिफायनरी प्रकल्प झाला असता तर रोजगारा नसल्याने कोकणातल्या तरुणावर उपासमारीची वेळ आली नसती . खासदार प्रकल्प हवा की नको ते ठरवत आहेत . मात्र , मुख्यमंत्र्यांनी याबाबत अधिसूचना काढावी मग जनतेला ठरवू दे प्रकल्प हवा की नको ते , असे प्रमोद जठार यावेळी म्हणाले .

 

 

 

 

Web Title: There will be a flying bridge in the whole space in Kankavali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.