‘ते’ चोरटे गुन्हेगारी प्रवृत्तीचे

By admin | Published: August 4, 2015 11:51 PM2015-08-04T23:51:51+5:302015-08-04T23:51:51+5:30

आॅपरेशन आॅल आऊट : अद्याप सहा जणांना पकडण्यात अपयश

'They' of theft criminal tendencies | ‘ते’ चोरटे गुन्हेगारी प्रवृत्तीचे

‘ते’ चोरटे गुन्हेगारी प्रवृत्तीचे

Next

अनंत जाधव - सावंतवाडी--सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची झोप उडवून देणाऱ्या तीन चोरट्यांना पकडून पोलिसांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ मोहीम फत्ते केली. तरी अद्याप सहा चोरट्यांना पकडण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले नाही. या चोरट्यांनी गेल्या वर्षीही चोऱ्या केल्या आहेत. हे आता पोलीस तपासात पुढे येत आहे. यातील सुरेश मदोरिया याने तर मध्यप्रदेशमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यापासून तो फरार असून मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यात या टोळीने चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल शंभर ते दीडशे चोऱ्या करून पोलिसांची झोप उडवणारी ही टोळी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील भिल्ल समाजातील आहे. टोळीचा पूर्वंपार चोरी हाच व्यवसाय आहे. यात नऊ जण कार्यरत आहे. टोळीने गेल्या काही वर्षात गुजरात, मुंबई, मध्यप्रदेश आदी ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. या टोळीतील सुरेश सुभान मादोरिया हा हा मास्टर मार्इंड आहे. सावंतवाडी पोलिसांनी या चोरट्याला वेगळीकडे, तर मोहर्निया अजनार व रमेश अजनार या दोघांना वेगळ्या कोठडीत ठेवले आहे. यात सुरेश याने तर वयाच्या २२ व्या वर्षी मध्यप्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्यावरच गोळीबार केला होता. त्यात हा पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून सुरेश हा फरार असून तो चार-पाच वर्षांपासून चोरट्यांच्या टोळक्यात सामील झाला आहे. अनेक वर्षे तो मध्यप्रदेश पोलिसांना चकवा देत असून मध्यप्रदेश पोलिसांनाही तो हवा आहे. ही टोळी मध्यप्रदेशातील भिल्ल समाजातील असून त्यांचे गाव जंगल परिसरात असल्याने स्थानिक पोलीसही या गावामध्ये जाण्यास बरेच घाबरतात. याचाच फायदा ही टोळी घेते. या टोळीने २०१३ पासून सिंधुदुर्गमध्ये बंद घरे हेरण्यास सुरुवात केली होती. त्यातून ते छोट्या-मोठ्या चोऱ्या करीत असत. पण पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर्षी महामार्गावरची गावे निवडली. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी व बांदा या चार ठिकाणी त्यांनी बंद घरे फोडली.


गोवेकर यांच्या घरातील पाच लाखांवर डल्ला
माजगाव-गरड भागात असलेल्या सुभाष गोवेकर यांच्या घरातील पाच लाखाची रोकड लंपास झाल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद असून, ही चोरीही याच चोरट्यांनी केली आहे.
दिवसा गोवेकर राहत असलेल्या कॉलनीतून फेरफटका मारल्यानंतर घर बंद दिसले म्हणून त्यांनी मध्यरात्री २ च्या सुमारास या घरात प्रवेश केला. ज्यावेळी पोलिस खाली सही मारण्यासाठी आले होते, त्यावेळी ही टोळी चोरी करीत होती, असे तपासात पुढे आले आहे.
चोरट्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय आखले होते. सावंतवाडी, कुडाळ व कणकवलीतील रेल्वेस्थानके पळण्यासाठी वापर करत होते.

पोलिसांच्या प्रयत्नांना यश
चोरट्यांची ही टोळी गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग पोलिसांची झोप उडवत आहे. सिंधुदुर्ग चोरी करण्यासाठी सुरक्षित असल्याचे त्यांना वाटत होते. यावर्षी पोलिसांनी फास आवळला आणि तिघांना पकडण्यात यश मिळवले.
त्यामुळे आता सिंधुदुर्गमध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. चोरट्यांची ही टोळी गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग पोलिसांची झोप उडवत होती. त्यांच्यादृष्टीने सिंधुदुर्ग चोरी करण्यासाठी सुरक्षित असल्याचे त्यांना वाटत होते. पण यावर्षी पोलिसांना यश आले.
त्यामुळे आता सिंधुदुर्गमध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. पोलीस आता त्यादृष्टीने तपासात अग्रेसर झाले आहेत.
दिवसभर एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी फिरून बंद घरे शोधून काढत असत आणि रात्रीच्या वेळी ते चोऱ्या करीत होते. अनेकवेळा त्यांना पोलिसांनीही हटकले होते. पण त्यांनी पोलिसांना मागमूसही लागू दिला नाही, हे विशेष.

Web Title: 'They' of theft criminal tendencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.