कलमठ येथे चोरट्यानी बंद बंगला फोडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:13 PM2020-11-28T15:13:40+5:302020-11-28T15:17:03+5:30

kankvali, crimenews, police, sindhudurng कणकवली शहरालगतच्या कलमठ गजानन नगर भागातील एक बंद बंगला चोरट्यांनी फोडला आहे . गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला . या बंगल्यातून सुमारे ४० हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली असून पोलिसांनी चौघा संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे .

Thieves break into closed bungalow at Kalamath! Four suspects in custody | कलमठ येथे चोरट्यानी बंद बंगला फोडला !

 कलमठ गजानन नगर येथील लक्ष्मण नारकर यांच्या घरातील कपाटातील साहित्य चोरट्यानी अस्थाव्यस्थ करून टाकले होते.

Next
ठळक मुद्देकलमठ येथे चोरट्यानी बंद बंगला फोडला !सुमारे ४० हजाराची रोकड लंपास ; चौघे संशयित ताब्यात

कणकवली : कणकवली शहरालगतच्या कलमठ गजानन नगर भागातील एक बंद बंगला चोरट्यांनी फोडला आहे . गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला . या बंगल्यातून सुमारे ४० हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली असून पोलिसांनी चौघा संशयितांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे .

कणकवली शहर आणि लगतच्या कलमठ गावात दहा दिवसापूर्वीही घरफोडीच्या घटना घडल्या होत्या . त्यानंतर गुरुवारी पुन्हा कलमठ येथे बंगला फोडल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे .
कलमठ गजानन नगर येथे करूळ हायस्कुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण सदाशिव नारकर यांचा बंगला आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन कालावधीत ते कुटुंबासह करंजे येथील आपल्या मूळ गावी राहण्यास गेले होते. गुरुवारी सकाळी त्यांची पत्नी बंगल्याकडे आली असता समोरील दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. तिने घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे तसेच इतर साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले होते. तसेच कपाटातील चाळीस हजाराची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.


त्यामुळे या घटनेबाबतची माहिती पत्नीने लक्ष्मण नारकर यांना दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलिसांना घटनेबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ओरोस येथून ठसे तज्नाना तसेच श्वान पथकाला पाचारण केले. या श्वान पथकातील श्वान कलमठ येथील बिडयेवाडी येथे जाऊन घुटमळला.


तर नारकर यांच्या घरातील कपाटात असलेल्या मोबाईलच्या खोक्यावर काही ठसे मिळाले आहेत. त्या अनुशँगाणे पोलीसानी तपासाची सूत्रे फिरवली आहेत. या चोरीच्या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत करण्याची प्रक्रिया सुरू होती . या घटनेचा पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अधिक तपास करीत आहे.

लवकरच धागेदोरे मिळतील !

कलमठ चोरीप्रकरणात ताब्यात घेतलेल्या चार संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्या संशयितांचा या चोरीप्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचे धागेदोरेही निश्चितपणे मिळू शकतील. कारण सर्व घटनातील चोरी करण्याची पध्द्त समान आहे. असे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी सांगितले.
 

Web Title: Thieves break into closed bungalow at Kalamath! Four suspects in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.