वयाच्या १५ व्या वर्षापासून बाबल्या करतोय चोऱ्या, तीन चोऱ्यांची दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:35 PM2018-07-05T16:35:36+5:302018-07-05T16:36:28+5:30
कलमठ-गुरववाडी येथील चोरीप्रकरणी संशयित शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक याला पणदूर तिठा येथे कणकवली पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर त्याने केलेल्या आणखी तीन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, रत्नागिरी येथे बाबल्याने चोऱ्या केल्या आहेत. बाबल्या वयाच्या १५ व्या वर्षापासून चोऱ्या करीत आहे.
सिंधुदुर्ग : कलमठ-गुरववाडी येथील चोरीप्रकरणी संशयित शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक याला पणदूर तिठा येथे कणकवली पोलिसांनी सापळा रचून अटक केल्यानंतर त्याने केलेल्या आणखी तीन चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. सावंतवाडी, ओरोस, कणकवली, रत्नागिरी येथे बाबल्याने चोऱ्या केल्या आहेत. बाबल्या वयाच्या १५ व्या वर्षापासून चोऱ्या करीत आहे.
चोरीला सुरुवात केली त्यावेळी तो अल्पवयीन होता. आता मात्र तो सज्ञान झाला आहे. बाबल्याला अटक करण्याची कारवाई सोमवारी सायंकाळी केली होती. शत्रुघ्न उर्फ बाबल्या नाईक (१९, रा. मांडकुली, ता. कुडाळ) याने कलमठ-गुरववाडी येथे १९ ते २६ जून या कालावधीत रविभूषण लाड यांच्या घरात भाड्याने राहणारा संदीप जाधव याने घरासमोरर् ंउभी करून ठेवलेली दुचाकी चोरली. याबाबत जाधव याने २६ जून रोजी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.
नाईक याला चोरीप्रकरणी अटक झाल्यानंतर तो डिसेंबरमध्ये जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने ३० जानेवारी २०१८ रोजी कुडाळ येथे घरफोडी केली होती. तत्पूर्वी रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली-लक्ष्मीनारायण वाडी येथील अमोल रामचंद्र घडशी यांची २४ जानेवारी रोजी पहाटे ५.१५ ते ५.३५ या कालावधीत दुचाकी चोरली.
अमोल घडशी यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आपली दुचाकी लावून ठेवली होती. अमोल घडशी रेल्वे स्थानकावर गेल्याची संधी साधून बाबल्या नाईक याने त्यांची गाडी लंपास केली होती. ही गाडी ओसरगाव येथे बोर्डवे रस्त्यावर आणून ठेवली होती. रस्त्याच्या कडेला जंगलमय भागात बाबल्या गाड्या लपवून ठेवत असे