तारली गोळा करण्यासाठी उजाडला तिसरा दिवस, जेसीबीच्या सहाय्याने मासळी ओढण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 07:50 PM2017-12-11T19:50:51+5:302017-12-11T19:50:58+5:30

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली.

The third day to collect the salvation, the time to take the fish with JCB | तारली गोळा करण्यासाठी उजाडला तिसरा दिवस, जेसीबीच्या सहाय्याने मासळी ओढण्याची वेळ

तारली गोळा करण्यासाठी उजाडला तिसरा दिवस, जेसीबीच्या सहाय्याने मासळी ओढण्याची वेळ

Next

मालवण : ओखी चक्रीवादळानंतर समुद्रात मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वायरी येथील नारायण तोडणकर रापण संघाच्या रापणीत रविवारी मोठ्या प्रमाणात तारली मासळीची मिळाली. किना-यावर ओढण्यात येणारी मासळी गोळा करण्याचे काम दुस-या दिवशी म्हणजेच सोमवारीही सुरूच होते. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या परिसरात सापडलेली मासळी गोळा करून मच्छीमार हैराण झाले तर रात्रभर मासळी गोळा करून मच्छीमार दमल्याने परप्रांतातील कामगारांना मासळी गोळा करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. तोडणकर यांच्या रापणीस सुमारे तीनशेहून अधिक खंडी तारली मासळी मिळाली. या मासळीमुळे रापणकर संघास लाखो रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे.

किनारपट्टी भागातील रापणकर मच्छीमारांच्या होड्यांचे तसेच जाळ्यांचे ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झाले होते. वादळाच्या काळात मासेमारी बंद असल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र समुद्रातील वातावरण निवळल्यानंतर मच्छीमार नव्या जोमाने मासेमारीस उतरला. यात पहिल्याच टप्प्यात वायरी येथील नारायण तोडणकर यांच्या रापणीस रविवारी तारली मासळीचा बंपर मिळाला.

रात्रभर मासळी ओढून ती वाहनांमधून पाठविण्यासाठी प्रथमच जेसीबीचा वापर करण्याची वेळ मच्छीमारांवर आली. उर्वरीत मासळी गोळा करण्यास आणखी एक दिवस लागेल, अशी परिस्थिती आहे. नारायण तोडणकर रापण संघाच्या जाळ्या पाठोपाठ मेस्त रापणकर संघाची रापण असून ती ओढायची बाकी आहे. मात्र तोडणकर यांच्या रापणीस मिळालेली मासळी गोळा करण्यास आणखीन एक लागणार आहे. त्यानंतर मेस्त यांची रापण ओढण्यात येणार असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

दुर्गंधीचे साम्राज्य
मच्छीमारांच्या जाळीत अनपेक्षित तारली मासळी मिळाली. ही मासळी निर्यात केली जात असून, मासळी वाहतूक करणा-या वाहनातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली जात आहे. किनारपट्टीवर तारली मासळीचा खच असल्याने खराब झालेल्या मासळीला प्रचंड दुर्गंधी येत आहे. तर मालवण- कसाल व मालवण वेंगुर्ले तसेच मावळण-कुडाळ या मार्गावर मासळी वाहतूक होणा-या वाहनांतून मासळीच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अजूनही काही दिवस दुर्गंधी रस्त्यावरील नागरिकांना सहन करावा लागणर आहे.

Web Title: The third day to collect the salvation, the time to take the fish with JCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.