बांदा-इन्सुली नाक्यावर गाड्यांची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 07:44 PM2020-12-28T19:44:08+5:302020-12-28T19:46:06+5:30

New Year police sindhudurg- बांदा-इन्सुली तपासणी नाका येथे ब्रावो हे श्वानपथक तपासणीसाठी तैनात केले होते. यामुळे अमली पदार्थांची तस्करी विचारात घेऊन गाड्यांची कसून तापसणी करण्यात येत होती.

Thorough inspection of vehicles at Banda-Insuli Naka | बांदा-इन्सुली नाक्यावर गाड्यांची कसून तपासणी

 इन्सुली तपासणी नाका येथे ब्रावो या श्वान पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. (छाया : अजित दळवी)

googlenewsNext
ठळक मुद्देबांदा-इन्सुली नाक्यावर गाड्यांची कसून तपासणी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस अलर्ट

बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक पर्यटक गोव्यातून मोठ्या संख्येने येत असतात. यावेळी दारुसह अमली पदार्थांची उलाढालसुद्धा होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा-इन्सुली तपासणी नाका येथे ब्रावो हे श्वानपथक तपासणीसाठी तैनात केले होते. यामुळे अमली पदार्थांची तस्करी विचारात घेऊन गाड्यांची कसून तापसणी करण्यात येत होती.

गेल्या काही महिन्यांत गोवा राज्यात अमली पदार्थांच्या विरोधात मोठ्या कारवाया करण्यात आल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा राज्याच्या एकदम नजीकच असल्याने अमली पदार्थ जिल्ह्यात येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात नवीन वर्षाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या भागांतून पर्यटक गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येत असतात.

अशावेळी गोवा राज्यात ड्रग्ज, दारू, गांजा यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याला जिल्ह्यात आळा बसणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बांदा येथे ब्रावो नामक श्वानासह पोलीस नाईक रूपेश परब, सहायक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. देसाई, पोलीस कॉन्स्टेबल मयूरराज कमुदनुरे यांचे पथक तैनात करण्यात आले होते.

अवैध वाहतूक व्यावसायिकांचे धाबे दणाणले

गोवा राज्यातून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू झाल्याने अवैध वाहतूक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गोवा, बेळगाव राज्यांतून होणारी अवैध वाहतूक, अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी आंबोली व बांदा पत्रादेवी तपासणी सीमाभागावर कडक लक्ष देणे गरजेचे आहे. फक्त बांदा पोलीस वाहनांची तपासणी करीत असल्याचे दिसून आले.



 

Web Title: Thorough inspection of vehicles at Banda-Insuli Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.