अवैध शिकार प्रतिबंधक पथकाकडून कसून चौकशी

By admin | Published: February 15, 2016 10:04 PM2016-02-15T22:04:42+5:302016-02-16T00:23:56+5:30

खवले मांजर तस्करी : चिपळूणचा ‘मंगेश’ सापडेना!

A thorough investigation by the illegal hunting squad | अवैध शिकार प्रतिबंधक पथकाकडून कसून चौकशी

अवैध शिकार प्रतिबंधक पथकाकडून कसून चौकशी

Next

दापोली : सहा लाख रुपयांच्या खवले मांजर खवल्याची तस्करीप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी संतोष पवार व अशोक पवार या दोन सख्ख्या भावांना अटक केली होती. यानंतर वन विभागाने शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चारजणांना अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींची अवैध शिकार प्रतिबंध पथक, मुंबई यांच्याकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. चिपळूणमध्ये २ महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेच्या आरोपीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, या दोघांना अटक झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी तपासादरम्यान शिकार करणाऱ्यांची काही नावे सांगितली. त्यानुसार पुढील कारवाईत चारजणांना अटक झाली. सहा आरोपींना १५ तारेखपर्यंत पोलीस कस्टडीसुद्धा सुनावण्यात आली होती. मात्र, याचा खरा सूत्रधार कोण? त्याच्यापर्यंत तपास पोहोचलाच नाही. (प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माल कसा जायचा?
संतोष पवार व अशोक पवार ज्या चिपळूणच्या मंगेश नामक व्यक्तिला खवले पुरवत होते, त्याचा थांगपत्ता वन विभागाला लागला नाही. चिपळूणची जी व्यक्ती हा माल घेत होती. नेमकी ती व्यक्ती माहीत नाही. आपल्याला त्यांनी सांगितले होते, त्यावरून आपण पाच हजार रुपये किलोप्रमाणे त्याच्याकडे माल देत होतो, अशी माहिती तपासात समोर आली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माल कसा जायचा, हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत.


शिकाऱ्याला हजार रुपये
चिपळूणमधील व्यक्ती आपल्याकडे खवले मांजराची शिकार करण्यासंदर्भात आली होती. त्यांनीच आपल्याला तुम्ही शिकार करा, आम्ही खवले विकत घेतो, असे सांगितले होते. शिकाऱ्याला केवळ एक हजार रुपये किलो दिले जायचे. हा माल घेऊन ५ हजार रुपये किलोने द्यायचे.

वन्य प्राणी वाचवण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर असून, समाजाने जागरूकता बाळगल्यास तस्करीला आळा बसेल. हत्तीचे दात, वाघांची कातडी, नखे, खवल्या मांजराचे खवले यांची तस्करी होत आहे.
- एम. मारांको,
अवैध शिकार प्रतिबंध पथकप्रमुख, वेस्टर्न झोन.

Web Title: A thorough investigation by the illegal hunting squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.