शंभरावर विद्यार्थी रसायनशास्त्रात अनुत्तीर्ण
By admin | Published: February 23, 2016 12:06 AM2016-02-23T00:06:27+5:302016-02-23T00:06:27+5:30
बिएससी रसायनशास्त्राच्या पाचव्या सेमिस्टरमध्ये शंभरावर विद्यार्थ्यांना केवळ २ ते १० गुण मिळाल्याने ते अनुर्तिर्ण झालेत
आंबोली : आंबोली-कामतवाडी येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दत्ताराम गुणाजी सावंत (वय ७२) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बांबोळी-गोवा येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला.
आंबोली ग्रामपंचायत येथील रस्त्यावरून आपल्या बाजूने सायकलवरून जात असलेल्या सावंत यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर गोव्याच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ (जीए०३ सी ९५०५) उभी असल्याचे चंबडू पाटील यांनी पाहिले. तसेच त्या गाडीतील प्रवासी भयभीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याच गाडीने येथील लोकांनी सावंत यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व ती गाडी निघून गेली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी अपघात घडण्यापूर्वी आणि नंतरचे येथील सीसाटीव्हीचे फुटेज तपासले.
पण रात्रीची वेळ, पोलीस ठाण्याकडील अंधूक वीजेचा प्रकाशम, कॅमेऱ्याचे भलतीकडेच असलेले अँगल तसेच कॅमेऱ्यांवर बुरशी चढली असल्याने गाडीविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे चंबडू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
रात्री ३ च्या सुमारास सावंतवाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत आपा गावडे यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजेंद्र भिसे, विलास नर, नितीन उम्रसकर आदी करीत आहेत. (वार्ताहर)