कणकवली विधानसभा मतदार संघासाठी तीन रुग्णवाहिका देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 05:35 PM2021-03-17T17:35:47+5:302021-03-17T17:37:40+5:30

Nitesh Rane Sindhudurg- कणकवली विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय (कणकवली), ग्रामीण रुग्णालय (देवगड) व ग्रामीण रुग्णालय (वैभववाडी) या तीन रुग्णालयांना नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्याचे लोकार्पण १८ मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.

Three ambulances will be provided for Kankavli assembly constituency | कणकवली विधानसभा मतदार संघासाठी तीन रुग्णवाहिका देणार

कणकवली विधानसभा मतदार संघासाठी तीन रुग्णवाहिका देणार

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली विधानसभा मतदार संघासाठी तीन रुग्णवाहिका देणार नीतेश राणे यांनी केले जाहीर; १८ मार्च रोजी लोकार्पण

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय (कणकवली), ग्रामीण रुग्णालय (देवगड) व ग्रामीण रुग्णालय (वैभववाडी) या तीन रुग्णालयांना नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्याचे लोकार्पण १८ मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या तीन तालुक्यांतील शासकीय रुग्णालयांना अनेकवेळा दिलेल्या भेटीच्यावेळी रुग्णवाहिकेअभावी होणारी रुग्णांची गैरसोय आरोग्य यंत्रणेकडून लक्षात आणून दिली जात असे.

त्यामुळे शासनाच्या भरवशावर न राहता आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सुमारे १७ लाख रुपये किमतीच्या ३ वातानुकूलित रूग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव आपण दिला होता. त्यातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण १८ मार्च रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही रुग्णवाहिका

कणकवली-देवगड-वैभववाडी हा डोंगराळ मतदारसंघ असल्याने व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे तसेच पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यामध्ये अडचणी येत होत्या. काहीवेळा उपचार मिळण्यास उशीर झाल्याने रुग्णांच्या जिवावर बेतत होते. त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघातील ३ मुख्य शासकीय रुग्णालयांना रुग्णवाहिका मंजूर करून दिल्या आहेत. आगामी काळात या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रानाही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे, असेही त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Three ambulances will be provided for Kankavli assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.