पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्याचे नुकसान, संततधार पावसाचा फटका

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 15, 2022 12:51 PM2022-09-15T12:51:01+5:302022-09-15T12:51:41+5:30

कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून बुधवारी रात्री पणदूर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

three bike were damaged due to the collapse of the protective wall on the shed In Pandur | पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्याचे नुकसान, संततधार पावसाचा फटका

पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्याचे नुकसान, संततधार पावसाचा फटका

googlenewsNext

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील पणदुर येथे संरक्षक भिंत शेडवर कोसळल्याने तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला. ही घटना पणदुर-सावंतवाडा येथे घडली. जर्नादन सावंत, गणपत राणे आणि गोपाळ सावंत यांच्या दुचाकीचे अंदाजे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे.

याबाबत गुरूवारी सकाळी सरपंच दादा साईल, पोलीस पाटील देऊ सावंत, ग्रामपंचायत सदस्य आबा सावंत, सदस्य बबन पणदूरकर, माजी सरपंच श्यामसुंदर सावंत, रत्नदीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गावच्या तलाठी श्वेता दळवी तसेच कुडाळ तहसीलदार यांना याबाबतची माहिती देण्यात आली.

कुडाळ तालुक्यात मागील चार दिवस मुसळधार पाऊस होत असून बुधवारी रात्री पणदूर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. गावात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला आलेली मोठी झाडे सुद्धा कोसळली असून सरपंच दादा साई यांनी ही झाडे कटिंग करून येथील मार्ग सुरळीत केला.

Web Title: three bike were damaged due to the collapse of the protective wall on the shed In Pandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.