गव्याला विजेचा शॉक देऊन मारणाऱ्याला तीन दिवसांची वन कोठडी, दोडामार्ग-पणतुर्ली येथील प्रकार

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 10, 2022 04:25 PM2022-08-10T16:25:48+5:302022-08-10T16:44:39+5:30

तपासात सर्व बनाव उघड झाला

Three days of forest confinement for the one who electrocuted the gaur | गव्याला विजेचा शॉक देऊन मारणाऱ्याला तीन दिवसांची वन कोठडी, दोडामार्ग-पणतुर्ली येथील प्रकार

संग्रहित फोटो

Next

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : स्वतःच्या शेतात गव्याला विजेचा शॉक देऊन मारणाऱ्या दोडामार्ग येथील सुनील गवस याला न्यायालयात हजर केले असता त्याला १३ ऑगस्ट पर्यंत वन कोठडी देण्यात आली. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी पणतुर्ली येथे उघड झाला होता.

आपल्या शेतात आलेल्या गव्याला गवस याने विजेचा झटका दिला होता. यात गव्याचा मृत्यू झाला. दरम्यान शेतात गव्याचा मृत्यू झाला असल्याची तक्रार घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला. मात्र त्यानंतर झालेल्या तपासात त्याचा हा सर्व बनाव उघड झाला.

काल, मंगळवारी रात्री त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तर आज, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १३ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली.

Web Title: Three days of forest confinement for the one who electrocuted the gaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.