राज्य फुटबॉल टेनिस स्पर्धेत जिल्ह्याला तीन सुवर्ण
By admin | Published: January 22, 2015 11:31 PM2015-01-22T23:31:46+5:302015-01-23T00:47:17+5:30
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ऐश्वर्या सुर्वे, ऋतुशा लढ्ढा, सिद्धी शिंदे आणि सृष्टी महाडिक यांनी महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान भक्कम केले
रत्नागिरी : सहावी राज्यस्तरीय फुटबॉल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०१४-१५ जिल्हा क्रीडा संकुल, सोलापूर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरीतील खेळाडूंनी सहभागी होऊन सुवर्ण तसेच कांस्य पदकांची कमाई केली.जिल्हा संघातून नेतृत्व करताना १४ वर्षांखालील मुलींमध्ये सिंगल प्रकारात ऐश्वर्या सुर्वे हिने सुवर्णपदक तसेच १४ वर्षांखालील मुलांमध्ये अपूर्व पवार याने सिंगल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. १८ वर्षांखालील मुलींमध्ये सिंगल या प्रकारात सृष्टी महाडिक हिने सुवर्ण तसेच ट्रिपल या प्रकारात ऋतुशा लढ्ढा, सिद्धी शिंदे आणि सृष्टी महाडिक यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचबरोबर १४ वर्षांखालील मुलांमध्ये डबल या प्रकारात साहील पवार आणि महेश परिहार यांनी जिल्ह्याच्या यशात भर घातली.या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ऐश्वर्या सुर्वे, ऋतुशा लढ्ढा, सिद्धी शिंदे आणि सृष्टी महाडिक यांनी महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान भक्कम केले. येत्या राष्ट्रीय फुटबॉल टेनिस स्पर्धेमध्ये हे खेळाडू महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करतील. या यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी जिल्हा फुटबॉल टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षा योगिता खाडे, संघ प्रशिक्षक म्हणून चेतन घाणेकर व संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल जिल्हा व शहर फुटबॉल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष फकीर वणू तसेच रत्नागिरी तालुका व शहर फुटबॉल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष गणेश धुरी, अस्लम बारगीर, नगरसेवक सुदेश मयेकर, सुयोग सावंत, क्रीडाधिकारी नितीन तारळकर तसेच नागरिकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)