सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का

By सुधीर राणे | Published: November 7, 2022 12:14 PM2022-11-07T12:14:21+5:302022-11-07T12:16:40+5:30

गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश

Three members of Gandhinagar gram panchayat in Kankavali taluka including the sarpanch joined the BJP | सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का

सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का

googlenewsNext

कणकवली : कणकवली तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश अनंत बोभाटे यांच्यासह सदस्य सुनीता अनाजी सावंत, मंजुषा महादेव बोभाटे, प्रसन्ना प्रशांत सावंत व शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री इतर उपस्थित होते. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत गावात कोणतेही विकास काम न झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच मंगेश बोभाटे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Three members of Gandhinagar gram panchayat in Kankavali taluka including the sarpanch joined the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.