पुण्यातील तिघा दरोडेखोरांना आंबोलीत पकडले; हिंजवडी येथील ज्वेलर्सवर टाकला होता दरोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 10:58 PM2024-08-03T22:58:01+5:302024-08-03T22:58:21+5:30

दोन बंदुकासह जिवंत काडतुसे सोन्या चांदीचे दागिने जप्त.

Three robbers from Pune were caught in Amboli | पुण्यातील तिघा दरोडेखोरांना आंबोलीत पकडले; हिंजवडी येथील ज्वेलर्सवर टाकला होता दरोडा

पुण्यातील तिघा दरोडेखोरांना आंबोलीत पकडले; हिंजवडी येथील ज्वेलर्सवर टाकला होता दरोडा

सावंतवाडी : पुणे हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स वर दरोडा टाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांना आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले दुरक्षत्रावरील पोलिसांनी अचानक कार थांबल्यानंतर दरोडेखोरांकडून कारच दुरक्षेत्रावरील पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी जीवावर उदार होत या दरोडेखोरांना पकडले  त्याच्याकडून दोन बंदुकासह जिवंत काडतूसे सोन्या चांदीचा ऐवज जप्त केला आहे 

घटनेनंतर आरोपींना सावंतवाडीत आणण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी पिंपरी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील सराफ दुकानात भरदिवसा पाच दरोडेखोरांकडून सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकान मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली तसेच मिळतील ते दागिने घेऊन  पोबारा केला होता या घटनेची नोंद हिंजवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्यानंतर पिंपरी चिंचवड तसेच हिंजवडी पोलिस आरोपीचा पाठलाग करत होते.या पाठलागा नंतर या दरोडेखोरांनी गोवा गाठण्याचे ठरवले त्या प्रमाणे शनिवारी गोव्याकडे जात असतना सायंकाळी आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर आले असता  आंबोली पोलीस दुरक्षेत्रावरील पोलिसांनी त्याची कार थांबवली त्यावेळी या दरोडेखोरांनी कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई आबा पिळणकर दिपक शिंदे अभिजीत कांबळे यांनी स्वताच्या जीवावर उदार होत या दरोडेखोरांना कार सह जागेवर अडवून धरत तेथेच त्यांना पकडले.

यात अल्ताफ बाबू खान (24) गोविंद भवरालाल दिवाणी (23) रातुराम कृष्णराम बिष्णोई (26) अशी तिघांची नावे आहेत.या सर्व आरोपींना सावंतवाडीत आणण्यात आले असून त्यांची कारसह झाडाझडती घेतली असता या झाडाझडतीत दोन बंदुका सह जिवंत काडतुसे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले आले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले असून आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Three robbers from Pune were caught in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.