सिंधुदुर्गातील तीन लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब; पाहा, प्रकल्पातील पाणीसाठा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 11:56 AM2021-06-15T11:56:03+5:302021-06-15T11:56:23+5:30
Sindhudurg : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात १०२.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २२८.१८४० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे.
सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील हरकूळ, मालवण तालुक्यातील धामापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील माडखोल हे तीन लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ९ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ५० टक्क्या पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासात १०२.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये २२८.१८४० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५१.०१ टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – ४०.३२४०, अरुणा – १९.५३६८, कोर्ले- सातंडी – २०.८३८० लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – १.७३४०, नाधवडे – २.२४३२, ओटाव – १.२६९०, देंदोनवाडी – ०.६००९, तरंदळे – ०.९४१०, आडेली – ०.४२१०, आंबोली – १.१९६०, चोरगेवाडी – १.०४००, हातेरी – १.१७५०, माडखोल – १.६९००, निळेली – १.०३८०, ओरोस बुद्रुक – ०.९७४०, सनमटेंब – १.२२४०, तळेवाडी – डिगस – ०.२६८०, दाभाचीवाडी – ०.८१८०, पावशी – १.६३९०, शिरवल – ०.९९४०, पुळास – १.२५२०, वाफोली – ०.५८८०, कारिवडे – ०.५१६०, धामापूर – २.४४१०, हरकूळ – २.३८००, ओसरगाव – ०.१०२०, ओझरम – १.११५०, पोईप – ०.२५२०, शिरगाव – ०.३२६०, तिथवली – ०.७४७०, लोरे – ०.९१५० या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.