कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

By admin | Published: June 26, 2015 11:53 PM2015-06-26T23:53:14+5:302015-06-27T00:16:48+5:30

महावितरण : उद्दीष्टापेक्षा अधिक जोडण्या देत कामावर छाप, शेतकऱ्यात समाधान

Three thousand pairs of agricultural pumps | कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

Next

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून गेल्या सहा वर्षात कृषीपंपाच्या ३३८० वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. २००८मध्ये ११८३८ इतक्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या होत्या. २०१५मध्ये १५२१८ इतक्या जोडण्या झाल्या आहेत. २०१०पासून महावितरण कंपनीने दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक जोडण्या दिल्या आहेत.कोकणात भात लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात येते. भाताबरोबर नागली तसेच कडधान्य, तृणधान्य व भाजीपाला लागवड करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तसेच ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एकूणच भातशेतीबरोबर बागायतीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. आंबा, काजूबरोबर कलिंगड, केळी, पपई यांसारखी शेतीही करण्यात येत आहे. कोकण भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंप बसवण्यात येतात. कृषी विभागाकडून पंप अनुदानावर देण्यात येत असून, महावितरणकडून जोडण्या देण्यात येतात. गेल्या सहा वर्षात कृषीपंप जोडण्यांमध्ये ३३८० इतकी वाढ झाली असली तरी ५०० पेक्षा अधिक वीज जोडण्या प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील कातळभागातही माती विकत आणून बागायती फुलवण्यात आली आहे. कातळावर हजारो रुपये खर्चून विहिरी पाडण्यात आल्या आहेत. परंतु अशा ठिकाणी अद्याप कृषी पंपाच्या जोडण्या देण्यास महावितरण असमर्थ ठरले आहे. कातळ भागातील वीजजोडण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याची समस्या महावितरणपुढे उभी ठाकली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून कृषी पंप देऊनसुध्दा त्याला जोडण्या मिळत नसल्यामुळे पंप गंजत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. ठेकेदाराची समस्या महावितरण मांडत असले तरी त्यावर पर्याय काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ५००पेक्षा अधिक जोडण्या प्रलंबित असल्या तरी दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट महावितरणने पार केले आहे. जिल्ह्याच्या कृषीपंपाची आकडेवारी पाहता रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कृषी पंप आहेत. त्यापाठोपाठ दापोली व गुहागर तालुक्यात पंप आहेत. कृषी पंपाच्या आकडेवारीत रत्नागिरी मागोमाग दापोली व गुहागरची आघाडी आहे. या साऱ्यामध्ये महावितरणची भूमिका महत्वाची ठरली आहे. (प्रतिनिधी)

गेल्या सहा वर्षात महावितरणने तालुकानिहाय दिलेल्या जोडण्या
तालुका२००८ पर्यंत जोडण्या२००९२०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५एकूण
चिपळूण९०७६१४९४०७०७२८५७५१३५७
गुहागर१७५५६९४४६२८९४७१२१६७२२५०
खेड३१६९९२१२७२१३३२३४५९
दापोली१६९७५३६१६१९५१२११३२५९२२७९
मंडणगड५८१३८१३१४३४२१२१३५७५७
रत्नागिरी३४३९१००८५८५१८३१२६१७०१४६४१७८
संगमेश्वर८१७२३३२३२३९४२४६४४१०२४
राजापूर१४२५११५७५७७०७३९५७११७७०
लांजा९०११६४३४२२१२२२०९१११४४
एकूण११८३८३८०३९३४१४६२८५४५७२३६११५२१८

Web Title: Three thousand pairs of agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.