घोडगेवाडीत हत्तीचा थरारक पाठलाग, उपसरपंचाची कालव्यात उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:57 IST2019-05-13T22:57:23+5:302019-05-13T22:57:41+5:30
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणणाºया जंगली हत्तींचा कळप आता घोडगेवाडीत स्थिरावला आहे. घोडगेवाडीचे ...

घोडगेवाडीत हत्तीचा थरारक पाठलाग, उपसरपंचाची कालव्यात उडी
दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणणाºया जंगली हत्तींचा कळप आता घोडगेवाडीत स्थिरावला आहे. घोडगेवाडीचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांचा या कळपातील टस्कर हत्तीने थरारक पाठलाग केला. यावेळी कुडव यांनी जीव वाचविण्यासाठी कालव्यातील पाण्यात उडी मारल्याने ते बालंबाल बचावले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५च्या दरम्यान घडली.
गेल्या काही महिन्यांपासून तिलारी खोºयात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे घाटीवडे, बांबर्डे, विजघर, मुळस, हेवाळे, तेरवण-मेढे, सोनावल या भागातील शेतकरी, बागायतदार व ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. या कळपात टस्कर हत्तींचा देखील समावेश आहे. आतापर्यंत दोघांना या टस्करांनी हल्ला करून जखमी केले आहे. हत्ती संकटामुळे तिलारी खोºयातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.
गेले दोन दिवस हा कळप सोनवाल गावात तळ ठोकून होता. सोमवारी या कळपाने घोडगेवाडीच्या दिशेने मोर्चा वळविला आणि सायंकाळी तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या परिसरात जाऊन स्थिरावला. यावेळी या कळपातील टस्कराने घोडगेवाडीचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांच्यावर हल्ला चढविण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. कुडव यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचविण्यासाठी कालव्यात उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी घोडगेवाडी परिसरात दाखल झाले असून, हत्तींना हुसकावण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. ग्रामस्थांनी हत्ती स्थिरावलेल्या क्षेत्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
सोनावलमध्ये
हत्तींकडून नुकसान
घोडगेवाडीच्या दिशेने कूच करतेवेळी याच हत्तींच्या कळपाने सोनावलमधील शेतकरी रघुनाथ सोनवलकर, रवींद्र गवस, शिवराम गवस, मधुकर गवस यांच्या केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
या हत्तींच्या कळपामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.