आतापर्यंत बचत गटांना ६ कोटींचे कर्जवाटप
By admin | Published: December 27, 2015 10:10 PM2015-12-27T22:10:56+5:302015-12-28T00:56:24+5:30
स्वयंरोजगारातून उत्पादन : सध्या ६ हजार ४९ बचत गट कार्यान्वित
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह््यात एकूण ६ हजार ४९ बचत गट कार्यान्वित आहेत. महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय सुरू आहेत. व्यवसायासाठी जिल्ह््यातील एकूण ६५८ बचत गटांना ५ कोटी ९८ लाख ५२ हजारांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबातील महिला बचत गटांमार्फत स्वयंरोजगारातून विविध वस्तूंचे उत्पादन करण्यात येते. विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, इमिटीशन ज्वेलरी, शोभिवंत वस्तू, गोदडी, घरगुती कोकणी मसाले, घरगुती चवीचे कोकणी खाद्यपदार्थ, जेवण, नाश्ता, कोकणी मेवा, विविध फळांची सरबते, रस, सिरप, पापड, लोणची, विविध प्रकारची पिठे यांचे उत्पादन घेण्यात येते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तसेच अन्य संस्थातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात बचत गट सहभागी होऊन आपल्या उत्पादनांची विक्री करतात. तसेच व्यक्तीगत स्तरावरही बचत गटांद्वारे विक्री करण्यात येते.
बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या उत्पादनाबरोबरच आकर्षक पॅकेजिंग व चव याची प्रतवारीदेखील निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह््याबाहेर मुंबईत होणाऱ्या महोत्सवात, प्रदर्शनात बचत गट सहभागी होऊ लागले आहेत. उत्पादनाला होणारी वाढती मागणी यामुळे उत्पादन वाढीसाठी आवश्यक भांडवलाकरिता बचत गटांकडून कर्ज घेण्यात येते. बचत गटांना बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी २३६ बचत गटांना ३५ लाख १४ हजारांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर ६५८ बचत गटांना ५ कोटी ९८ लाख ५२ हजारांचे कर्ज वितरण बँकांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
शासनाचा उपक्रम : बचत गटातून आर्थिक सक्षमता
महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांची उन्नती होण्यासाठी शासनाने बचत गट ही संकल्पना राबविली. त्यानुसार ग्रामीण भागातही बचत गट स्थापन करण्यात आले. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी छोटे - मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यासाठी विविध बँकांनीदेखील त्यांना सहकार्य करण्यास सुरूवात केली आहे. या व्यवसायातून महिलांनी आपला विकास साधण्यास सुरूवात केली असून, अनेक बचत गट आर्थिक सक्षम झाले आहेत.
तालुकाबचत गट
संख्या
चिपळूण५९९
दापोली३७२
गुहागर५१५
खेड६२३
मंडणगड२७९
राजापूर७३३
रत्नागिरी१०९८
लांजा६५५
संगमेश्वर११७५
एकूण६०४९