सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून ‘श्रीं’चा जागर

By admin | Published: August 28, 2014 11:12 PM2014-08-28T23:12:48+5:302014-08-28T23:14:48+5:30

लाखो भक्तगण दाखल : भजनांनी रात्री जागणार

From today in Sindhudurg district the 'Jagar of Shree' | सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून ‘श्रीं’चा जागर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून ‘श्रीं’चा जागर

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या, शुक्रवारी ६४ हजार घरगुती, तर ३४ सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे श्री गणेशमूर्तींचे विधीवत पूजन करण्यात येणार आहे. उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
आज, गुरुवारी काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत श्री गणेशमूर्ती आणण्यात आल्या. त्यातच सोमवारपासून तीन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसाने आज काहीशी विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला.कोकणात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आणि घरोघरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला आज, शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात प्रारंभ होणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने घराघरांत लगबग सुरू आहे. कोकण रेल्वे, एसटी, खासगी बसेस तसेच खासगी वाहनांनी सिंधुदुर्गात अनेक भाविक दाखल झाले आहेत. यात मुंबईतील चाकरमान्यांचा मोठा सहभाग आहे.दरम्यान, आज सर्वत्र घरोघरी हरितालिकेचे पूजन करण्यात आले. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा गजबजलेल्या होत्या. घरांना रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नोकरीधंद्यानिमित्त मुंबई, पुण्यासह वेगवेगळ््या भागात स्थायिक झालेले कोकणवासीय आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. एरवी बंद असलेली घरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने उघडण्यात आली आहेत.

भजनांचे सूर दुमदुमणार
गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील घराघरांत उत्सव कालावधीत म्हणजे पुढील ११ दिवस आरती आणि भजनांचे सूर दुमदुमणार आहेत. रात्री जागविल्या जाणार असून, मुुंबईवरून आलेले चाकरमानी आणि येथील ग्रामस्थ मंडळी एकत्रितरीत्या भजनांमध्ये सामील होणार आहेत.

Web Title: From today in Sindhudurg district the 'Jagar of Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.