चिपळूण अर्बन बँकेसाठी आज मतदान

By Admin | Published: June 14, 2015 01:50 AM2015-06-14T01:50:41+5:302015-06-14T01:50:41+5:30

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : १५ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात

Today's poll for Chiplun Urban Bank | चिपळूण अर्बन बँकेसाठी आज मतदान

चिपळूण अर्बन बँकेसाठी आज मतदान

googlenewsNext

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर. के. बांगर यांनी दिली.
चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १५ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनेलने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर नवउदय पॅनेलने सहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ५ अपक्षांपैकी एक अपक्ष दोन जागेवर लढत असल्याने तो व अन्य एक अपक्ष मिळून दोघांचे पॅनेल आहे. दोन अपक्ष स्वतंत्र लढत आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण ३५ केंद्रांवर मतदान होणार आहे. पैकी २३ केंदे्र चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूल, प्रेमजीभाई आसर, गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल येथे आहेत, तर चिपळूणबाहेर गुहागरमध्ये पाच मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी पाटपन्हाळे हायस्कूल, शृंगारतळी येथे मतदान होणार आहे. देवरुख येथे दोन केंद्रे असून, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कन्या शाळा क्र.४ देवरुख येथे मतदान होणार आहे. दापोली सहायक निबंधक सहकार संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय रत्नागिरी, चिपळूण अर्बन को-आॅप. बँक शाखा पनवेल या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी एक-एक मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि पाच मतदान अधिकारी असतील. अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ४० पोलीस कर्मचारी तैनात ठेवले आहेत.
देवरुख व रत्नागिरीसाठी एक, लोटे (खेड) दापोलीसाठी एक व चिपळूणसाठी आठ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वांत जास्त २४ हजार ४७८ मतदार चिपळूणमध्ये आहेत. गुहागरमध्ये ५ हजार ५४८, लोटे येथे १ हजार ४२१, देवरुखमध्ये १ हजार ९६४, दापोली येथे २०७, रत्नागिरी येथे १३९ व पनवेल येथे १२० मतदार आहेत. ३५३ मते संस्था, फर्म व इतर आहेत. या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे शनिवारी अर्बन बँकेच्या राजाभाऊ रेडीज सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बांगर यांनी स्पष्ट केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रियांका माने काम पाहत आहेत. सोमवारी (दि. १५) सकाळी नऊ वाजता अर्बन बँकेच्या राजाभाऊ रेडीज सभागृहात मतमोजणी होणार आहे.

Web Title: Today's poll for Chiplun Urban Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.